Michael Lobo देणार भाजपचा राजीनामा; काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता

मायकल लोबो आज रविवारी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. याशिवाय ते भाजप (BJP) सदस्यत्वचा राजीनामा देऊन सोमवारी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करतील अशी शक्यता आहे.
Michael Lobo देणार भाजपचा राजीनामा; काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता
michael lobo Dainik Gomantak

Michael Lobo: कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो आज रविवारी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. याशिवाय ते भाजप (BJP) सदस्यत्वचा राजीनामा देऊन सोमवारी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करतील अशी शक्यता आहे. कारण लोबो हे कॉंग्रेस नेते केदार नाईक यांच्या गिरी-साळगाव मधल्या निवडणूक प्रचारासाठी उपस्थित असल्यामुळे, लवकरच त्याच्या कॉँग्रेस प्रवेशाची बातमी समोर येईल, असे बोलले जात आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी दिलायला लोबोही (Delilah Lobo) काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. मायकल लोबो (Michael Lobo) कळंगुट मतदारसंघांमधून तर दिलायला लोबो शिवोलीमधून (Siolim) निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

michael lobo
Corona Crisis: मडगाव जिल्हा रुग्णालय बंद असल्यामुळे रुग्णांचे हाल

गेल्या अनेक महिन्यांपासून लोबो भाजपवर नाराज आहेत. त्यातच लोबो यांनी टुगेदर फॉर बार्देश या अभियानाद्वारे भाजपला विरोध सुरू केला आहे. लोबो यांच्या या निर्णयामुळे भाजपकडे सध्या पेच निर्माण झाला आहे.

michael lobo
नाट्यगायक रामदास कामत निवर्तले

विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) लढवण्याचे निश्चित झाले असून त्या कोणत्या पक्षात लढवायच्या हे कार्यकर्त्यांनी ठरवायचे आहे. कार्यकर्ते जे सांगतील त्यानुसार दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असे मायकल लोबो यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com