राज्यसभा खासदारपदी फालेरो बिनविरोध

गोव्याचे माजी मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) हे पश्‍चिम बंगाल विधानसभेतून तृणमूल काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत.
राज्यसभा खासदारपदी फालेरो बिनविरोध
Luizinho Faleiro elected as Rajya Sabha MPDainik Gomantak

पणजी: गोव्याचे Goa माजी मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) हे पश्‍चिम बंगाल विधानसभेतून तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाच्यावतीने राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या खासदार अर्पिता घोष यांच्या राजीनाम्यामुळे या पक्षाची राज्यसभेतील खासदाराची जागा रिक्त झाली होती.

काही दिवसांपूर्वी राज्यसभेतील रिक्त असलेल्या पक्षाच्या खासदारपदाच्या जागेसाठी तृणमूल काँग्रेसतर्फे लुईझिन फालेरो यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या जागेसाठी आणखी कोणताही अर्ज न आल्याने पश्‍चिम बंगाल विधानसभा सभागृहाच्या सचिवांनी फालेरो यांची खासदारपदी निवड झाल्याची घोषणा करणारा आदेश काढला आहे.

Luizinho Faleiro elected as Rajya Sabha MP
मांद्रेतून सोपटेंची उमेदवारी फिक्स

गोव्यातील तृणमूल काँग्रेसची जबाबदारी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लुईझिन फालेरो यांच्यावर सोपविताना उपाध्यक्ष म्हणून पद देण्याबरोबरच त्यांना पक्षातर्फे राज्यसभेत खासदारही केले. त्यामुळे या पक्षाची प्रतिमा गोव्यात आणखी मजबूत झाली आहे. या पक्षाने गेल्या काही दिवसांत इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळविण्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळवले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com