गोव्याच्या मंत्रिमंडळातील नावं जवळपास निश्चित

केंद्रीय नेतृत्वाशी सल्लामसलत केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा अंतिम निर्णय
Goa Assembly
Goa AssemblyDainik Gomantak

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री कोण होणार या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं नावच निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीला दौऱ्यापूर्वी गोवा राज्य भाजपने आपल्या नवीन मंत्रिमंडळाच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त जागांना अंतिम रूप दिलं आहे. केंद्रीय नेतृत्वाशी सल्लामसलत केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशीही सुत्रांची माहिती आहे.

Goa Assembly
मगोप भाजपमध्ये विलीन करणार नाही : सुदिन ढवळीकर

12 पैकी 10 जागांवर भाजपच्या (BJP) उमेदवारांची नावं निश्चित झाली आहेत. भाजपला तीन आमदार देणार्‍या फोंडा तालुक्याला सर्वाधिक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. भाजप आपले माजी मंत्री विश्वजित राणे, मॉविन गुदिन्हो, गोविंद गावडे आणि नीलेश काब्राल यांनाही कायम ठेवण्याची शक्यता आहे. याशिवाय, पक्ष फोंड्याचे आमदार रवी नाईक, शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर, पर्वरीचे आमदार रोहन खंवटे आणि पणजीचे आमदार अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांना सामील करण्याची शक्यता आहे.

Goa Assembly
प्रमोद सावंत होळीनंतर घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

कुडतरीमधील अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Reginald Lawrence) हे मंत्रिमंडळातील एकमेव बिगर-भाजप आमदार असण्याची शक्यता आहे. गोव्यात 40 पैकी 20 जागा मिळवणाऱ्या भाजपला तीन अपक्ष आणि मगोपच्या दोन आमदारांचा पाठिंबा आहे. भाजप कोअर कमिटी एका वरिष्ठ सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित दोन जागांसाठी तीन नावं आघाडीवर आहेत. केंद्रीय नेतृत्वाने ढवळीकर यांना सामावून घेण्याचा निर्णय घेतल्यास एकच जागा रिकामी राहील, त्यामुळे भाजप आमदारांनी मगोपच्या पाठिंब्याला विरोध दर्शवला आहे.

Goa Assembly
...तर सुदिन ढवळीकरांनी मगोप भाजपमध्ये विलीन करावा : बाबूश

मगोप आमदारांच्या समावेशाला आमदार आणि पक्ष कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध असला तरी, अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेणार आहे. बाबूश मोन्सेरात यांच्यासह काही आमदारांचे असंही मत आहे की मगोपचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांना मंत्रिमंडळाचा भाग व्हायचे असेल तर MGP चे भाजपमध्ये विलीनीकरण करावे. उर्वरित जागेसाठी, सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई, काणकोणचे आमदार रमेश तवडकर आणि थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर शर्यतीत आहेत, मात्र सभापतीपदाची निवड झाल्यानंतर अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल, अशी माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com