गोव्यात 26 हजार नवमतदार विधानसभेला प्रथमच करणार मतदान

निवडणुकीचं बिगूल वाजलं, एकूण 11 लाख 56 हजार 464 मतदार हक्क बजावणार
गोव्यात 26 हजार नवमतदार विधानसभेला प्रथमच करणार मतदान
Goa Assembly Election 2022Dainik Gomantak

Goa Assembly Election 2022 : निवडणूक आयोगाने गोवा विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत गोव्यासह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गोव्यातील निवडणूक ही एकाच टप्प्यात घेतली जाणार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

Goa Assembly Election 2022
पर्रिकरांच्या पश्चात गोवा कोणाचं? गत निवडणुकीतील संख्याबळ जाणून घ्या

विधानसभा निवडणूक 2022 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर केली. 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा 44 हजार 772 मतदार वाढले असून यात 26 हजार 297 नवमतदार आहेत. 2017 च्या तुलनेत प्रत्येक मतदार संघात सर्वसाधारणपणे केवळ बाराशे मतांची भर पडली आहे. वाढलेला नव मतदारांचा आकडा कुणाच्या बाजूने उभा राहणार हा महत्वाचा मुद्दा आहे कारण हे प्रथमच मतदान करणारे असल्याने मतदान करणारच आहेत त्यामुळे ते निर्णायक ठरणार आहेत.

Goa Assembly Election 2022
Assembly Election 2022 : राज्यात 14 फेब्रुवारीला होणार मतदान, मतमोजणी 10 मार्चला

चालू विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्चला संपत असून 14 फेब्रुवारी रोजी राज्यात विधानसभेच्या निवडणुका (Goa Election 2022) होणार आहेत. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहे. या निवडणुकीत 18 आणि 19 वर्षातील 26 हजार 297 नवमतदार असून हे विधानसभेसाठी प्रथमच मतदान करणार आहेत.

Goa Assembly Election 2022
गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार, काँग्रेसलाही सोबत येण्याचं संजय राऊतांच आवाहन

30 हजारांची वाढ, तर 14 हजार कमी

नवीन मतदार याद्या बनवताना नाव नोंदणी आणि नाव वगळणे याबाबत मतदारांकडून (Voters) नोंदणी प्रस्ताव मागवण्यात आले होते. यानुसार 30 हजार 599 मतदार वाढले. तर 14 हजार 409 मतदार कमी झाले आहेत. कमी झालेल्या मतदारांमध्ये 7 हजार 556 मृत्यू असून 443 दुबार (रिपीट) मतदार आहेत. तर 93 बेपत्ता असून 135 अपात्र ठरले आहेत. याशिवाय 6202 इतर जागी स्थलांतरित झाले आहेत.

Goa Assembly Election 2022
निर्बंधांमुळे भाजपचा घरोघरी जाऊन प्रचार; विरोधी पक्षांची रणनीती काय?

80 वर्षांवरील 30 हजार ज्येष्ठ मतदार

निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केलेल्या यादीनुसार राज्यात एकूण 11 लाख 56 हजार 464 मतदार असून 5 लाख 39 हजार 420 उत्तर गोव्यात तर 6 लाख 17 हजार 44 दक्षिण गोव्यात मतदार आहेत. उत्तर गोव्यात 19 मतदार संघ येतात. तर दक्षिण गोव्यात २१ मतदार संघ येतात. आयोगाने तयार केलेल्या नवीन यादी नुसार 80 वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांची संख्या 30 हजार 38 असून विशेष मतदारांची संख्या 20 हजार 318 आहे. या सर्वांच्या मतदानासाठी आयोगाकडून यावेळी विशेष योजना आखली आहे. यंदा 1722 निवडणूक मतदान केंद्रावर विशेष सोय करण्यात आली आहे. याशिवाय ते पोस्टल मतदान करु शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com