गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढवणार? नवाब मलिक म्हणाले...

राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले, आम्हाला गोव्याची निवडणूक काँग्रेससोबत लढवायची होती, परंतु काही स्थानिक नेत्यांमुळे युती होऊ शकली नाही.
Nawab Malik
Nawab MalikDainik Gomantak

देशात आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. यामध्ये गोवा राज्याचही समावेश आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र (Maharashtra) सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटले, आम्हाला गोव्याची निवडणूक काँग्रेससोबत (Congress) लढवायची होती, परंतु काही स्थानिक नेत्यांमुळे युती होऊ शकली नाही. उद्या म्हणजेच मंगळवारी आमचे सरचिटणीस आणि एक मंत्री युतीबाबत बोलण्यासाठी गोव्यात जाणार आहेत. त्याचबरोबर मणिपूरमधील निवडणूक आम्ही काँग्रेससोबत मिळून लढू. वृत्तांवर विश्वास ठेवला तर शिवसेना गोव्यात 10 ते 15 जागा लढवू शकते.

Nawab Malik
Goa Election 2022: भाजपने 'त्यांना' नाकारले मात्र आप आणि शिवसेनेने स्वीकारले

पत्रकार परिषदेत मलिक पुढे म्हणाले की, तिन्ही पक्षांची युती फक्त महाराष्ट्रात आहे. अशा स्थितीत पक्षाची राष्ट्रीय समिती जो काही निर्णय घेईल, तोच शेवट असेल. गोव्यात काँग्रेससोबत युती व्हावी, अशी आमचीही इच्छा आहे. मात्र तेथील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी युती होऊ दिली नाही. ते पुढे म्हणाले की, मंगळवारी गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात चर्चा होणार आहे. अशा स्थितीत उद्या जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

गोव्यात शिवसेना 10-15 जागा लढवू शकते

शिवसेना (Shiv Sena) 10-15 जागा लढवणार असल्याचे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रविवारी सांगितले होते. गोव्यात शिवसेना मित्रपक्षासोबत निवडणूक लढवणार का, असा सवाल त्यांनी करण्यात आला होता. यावर राऊत म्हणाले की, आम्हीही गोव्यात जाणार असून त्यांचे नेतेही जाणार आहेत. गोव्याचे राजकारण 10-12 लोकांभोवती फिरते. गोव्यातील जनतेने सर्वसामान्यांना निवडून द्यावे, अशी आमची इच्छा आहे. या लोकांना आम्ही तिकीट देऊ.

Nawab Malik
Goa Assembly Election 2022: गोमंतकीय 'आप' ला स्विकारतील

टीएमसीसोबत युती नाही: दिनेश गुंडू

त्याचवेळी गोव्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस हाच एकमेव पर्याय असल्याचे गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी म्हटले आहे. गोव्यातील तृणमूल काँग्रेसची (TMC) वृत्ती अत्यंत वाईट असून त्यांचा हेतू चुकीचा आहे. काँग्रेस नेते पुढे म्हणाले की, गोव्यातील जनता निवडणुकीत टीएमसीला नाकारणार आहे. आम्ही त्यांच्याशी कोणत्याही युतीत नाही.

गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार

गोव्यातील विधानसभेच्या 40 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर निकाल 10 मार्चला लागणार आहेत. 21 जानेवारीपासून नामांकन सुरु होईल. 28 जानेवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने यावेळी कडक प्रोटोकॉल तयार केले आहेत. त्यानुसार 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही रॅली, रोड शो आणि पदयात्रेला परवानगी दिली जाणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com