गोव्यात राष्ट्रवादी अन् शिवसेना एकत्र निवडणूक लढणार, संजय राऊत यांची घोषणा

गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Sanjay Raut
Sanjay RautDainik Gomantak

आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका होत आहेत. यामध्ये गोवा राज्याचाही समावेश आहे. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत प्रयत्न करत होते. मात्र कॉंग्रेसने ऐनवेळी नाही म्हटल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. यामध्येच राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि संजय राऊत (Sanjay Raut) गोव्यामध्ये माध्यमाशी बोलत असताना महाविकास आघाडीच्या समावेशबद्दल बोलले.

गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना (Shiv Sena) एकत्र निवडणूक लढणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. उत्पल पर्रिकरांना (Utpal Parrikar) तिकीट द्यायचं का नाही हा भाजपचा प्रश्न आहे, परंतु उत्पल पर्रिकरांनी विचारलेले प्रश्न महत्वाचे असल्याचे देखील संजय राऊतांनी म्हटले आहे

Sanjay Raut
Goa Assembly Election: 'तिकीट द्या, अन्यथा अपक्ष लढू'!

दरम्यान, दरम्यान, संजय राऊत यांनी गोव्यात जाऊन निवडणूक लढवावी, इति चंद्रकांत पाटील.. ''कोणत्याही विधानसभेमध्ये निवडणूक लढवायची असेल तर त्या राज्याच्या मतदार यादीत मध्ये नाव असणे गरजेचे असते, एवढं भाजप नेत्यांना माहिती नाही, याचे आश्चर्य वाटते. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो,'' असं म्हणतं शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेत्यावर हल्लाबोल केला.

'गोवा विधानसभा निवडणूकीमध्ये आमची निर्णायक भूमिक राहणार आहे. आम्ही उमेदवारांची यादी उद्यापासून तयार करण्यास सुरुवात करत आहोत. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून कॉंग्रेसबरोबर युती संबंधी चर्चा करत आहोत. कॉंग्रेससोबत आम्ही युती करण्यासाठी तयारी करत असल्याचे यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut
Goa Assembly Election 2022: TMC ने 11 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

तसेच ते पुढे म्हणाले, ''जागा वाटपाबाबत आम्ही त्यावर चर्चाही करत आहोत. शिवसेना खासदार संजय राऊत यांची कॉंग्रेससोबत आघाडीबाबतीत चर्चा झाली आहे. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही आम्ही महाविकास आघाडीचा प्रयोग सफल करण्यासाठी तयार आहोत. सत्तेमध्ये असणाऱ्या भाजपला धडा शिकविण्यासाठी आम्ही कॉंग्रेससोबत जाण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच आम्ही गोव्यातील जनतेसाठी एक सक्षम सरकार बनिवण्यासाठी एकत्र आलो आहोत.''

संजय राऊत म्हणाले, ''महाराष्ट्रात विकास आघाडीचे सरकार उत्तम पध्दतीने चालू आहे. गोव्यात आम्ही निवडणूकपूर्व कॉंग्रेसबरोबर युती करण्यासाठी तयार आहोत. शिवसेना आणि राष्ट्रवादीने निर्णय घेतला आहे की, गोव्यात आम्ही एकत्र लढणार आहोत. विशेष म्हणजे आमच्याशिवाय गोव्यात सरकार बनू शकत नाही. मागील काही दिवसांपासून आयाराम आणि गयाराम या शब्दप्रयोगाचा वापर मोठ्याप्रमाणात केला जात आहे. गोव्यातही निवडणूकपूर्व वातावरण बदलत आहे. गोव्यात पहिल्यांदाच तृणमुल पक्ष विधानसभा निवडणूक लढवत आहे.''

दरम्यान ते म्हणाले, ''उत्पल पर्रीकरांचा विषय हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. ज्या मतदार संघाचं प्रतिनिधित्व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आज त्यांच्या मुलाला आमदारीकीच्या तिकीटासाठी झगडावं लागत आहे. उत्पल पर्रीकरांना पाठिंबा देण्यासाठी, आम्ही सर्व पक्षांना आवाहन केलं आहे. ज्यावेळी उत्पल पर्रीकर अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतील तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी तयार असू. सर्व पक्ष गोव्यात आपपल्या ताकदीवर निवडणूक लढवतील. शेवटी देशात लोकशाही आहे. ''

गोव्यातील जनता शहाणपणाने यावेळी मतदान करणार आहे. गोव्यातही आलेमाव आणि गेलेमाव आहेत. या निवडणूकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मिळून जाहीरनामा असणार आहे. गोव्यातील जनतेला नेमकं काय आपेक्षित आहे, याचा विचार करुन हा जाहीरनामा असणार आहे. ड्रग्जच्या बाबतीत आम्ही कुणालाही सोडणार नाही. कसिनोच्या संदर्भात आत्ता आमच्याकडे धोरण नाही, मात्र आम्ही सत्तेमध्ये आल्यास त्यासंबंधी धोरणही बनवू. आमच्याशिवाय महाराष्ट्रात सरकारमध्ये ते येऊ शकले असते का? याचा विचार कॉंग्रेसला विचार करावा लागणार आहे. पक्षाचं संघटन फक्त आयाराम आणि गयारामांनी मिळून बनत नाही. त्यासाठी काम करावं लागतं, असंही यावेळी राऊत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com