डिचोलीत भाजपसमोर विरोधकांचे आव्हान...

डिचोली विधानसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या मतदारसंघात भाजप वगळता अन्य प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असून, या उमेदवारांनी सध्या जनसंपर्कावर भर दिला आहे.
Dicholim:  Goa Assembly Election 2022 BJP

Dicholim: Goa Assembly Election 2022 BJP

Dainik Gomantak

डिचोली (तुकाराम सावंत): डिचोली विधानसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या मतदारसंघात भाजप वगळता अन्य प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असून, या उमेदवारांनी सध्या जनसंपर्कावर भर दिला आहे. दोन उमेदवारांनी तर प्रचाराची पहिली फेरीही पूर्ण केली आहे. डिचोली (Dicholim) मतदारसंघात डिचोली पालिकेसह साळ, मेणकुरे-धुमासे, लाटंबार्से, मुळगाव आणि अडवलपाल या पाच पंचायती आहेत. या मतदारसंघात एकूण मतदारसंख्या 27 हजार451 एवढी आहे, तर 43 मतदान केंद्रे आहेत.

Dicholim:  Goa Assembly Election 2022 BJP

शशांक देसाई झाले तृणमूलवासी..

राजकीय वैशिष्ट्य

मगो (MGP), काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) या प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष आमदार अनुभवलेल्या डिचोली मतदारसंघांला मोठा राजकीय इतिहास आणि वैशिष्ट्य आहे. मुख्यमंत्री ते सभापतीपद उपभोगण्याचा मान या डिचोली मतदारसंघाला मिळालेला आहे. शशिकलाताई काकोडकर (पहिल्या माजी महिला मुख्यमंत्री), हरिष झांट्ये (माजी शिक्षण आणि वीज मंत्री), पांडुरंग भटाळे (माजी सहकार मंत्री) आणि पांडुरंग राऊत (माजी वाहतूक मंत्री) या मंत्रिपदे सांभाळलेल्या नेत्यांनी डिचोली मतदारसंघांचे नेतृत्व केलेले आहे. या मतदारसंघांचे विद्यमान आमदार राजेश पाटणेकर (Rajesh Patanekar) हे विधानसभेचे विद्यमान सभापती आहेत. एवढा मोठा राजकीय इतिहास या मतदारसंघाला आहे.

Dicholim:  Goa Assembly Election 2022 BJP

'प्रियोळकरांनी धरला जोर, गोविंद गावडे वन्स मोअर'

पाटणेकरांना पुन्हा संधी?

सध्या या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असून, भाजपचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. पाटणेकर हे तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. या मतदारसंघातून अद्याप भाजपचा उमेदवार जाहीर झालेला नाही. तरीदेखील पुन्हा विद्यमान आमदार राजेश पाटणेकर यांचे नाव चर्चेत आहे. गेल्या महिन्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P.Nadda) यांच्या उपस्थितीत डिचोलीत भाजपची जाहीर सभा झाली. या सभेत नड्डा यांनी पाटणेकर यांच्या कार्यावर समाधान व्यक्त केल्याने पाटणेकर यांची बाजू भक्कम झाली आहे. त्या सभेनंतर भाजप कार्यकर्त्यांत ‘जोश’ निर्माण झाला आहे. दुसऱ्या बाजूने पाटणेकर यांच्यासह माजी जिल्हा पंचायत सदस्य शिल्पा नाईक या उमेदवारीच्या एक प्रमुख दावेदार आहेत. उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. या मतदारसंघात यावेळी विरोधकांचे प्रबळ आव्हान आहे. त्यामुळे या मतदारसंघातील भाजपचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी भाजप श्रेष्ठी कोणती चाल खेळतात, ते पहावे लागणार आहे.

Dicholim:  Goa Assembly Election 2022 BJP

सांगेतून विधानसभा निवडणूक लढवणारच: सावित्री कवळेकर

अपक्षाचे आव्हान

डिचोलीच्या राजकारणातील नवीन चेहरा असलेले शिक्षा व्हिजनचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. मध्यंतरी ते एखाद्या राजकीय पक्षाच्या बॅनरखाली निवडणूक लढविणार, अशी चर्चा होती. मात्र आपण अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविणार, असे गेल्याच महिन्यात डिचोलीत घेतलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत डॉ. शेट्ये यांनी जाहीरही केले आहे. गेल्यावर्षी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत डॉ. शेट्ये पुरस्कृत उमेदवार निवडून येताना भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर पालिका निवडणुकीत त्यांच्या गटाने समर्थन दिलेला एक नगरसेवकही निवडून आला आहे. डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरीही पूर्ण केली आहे. त्यांच्याशी प्रचारकार्यात जिल्हा पंचायत सदस्यासमवेत काही सरपंच, पंच तसेच काही माजी नगरसेवक सक्रिय सहभागी होत आहेत. मतदारसंघात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

काँग्रेसतर्फे मेघ:श्‍‍याम राऊत

काँग्रेसतर्फे डिचोलीतून मेघ:श्याम राऊत निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट आहे. मेघ:श्याम राऊत यांनी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी पेलताना डिचोलीत काँग्रेसला उर्जितावस्था मिळवून दिली आहे. त्यामुळे डिचोलीतून उमेदवारीसाठी काँग्रेस त्यांच्याशिवाय अन्य नावाचा विचार करू शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून राऊत हे वेगवेगळे मुद्दे घेऊन मतदारांसमोर जात आहेत. जनसंपर्कावरही त्यांनी भर दिला आहे. रिव्हॉल्युशनरी गोवन्सतर्फे (Revolutionary Goans) अनिश नाईक या युवकाला उमेदवार म्हणून उतरविण्यात येणार आहे.

Dicholim:  Goa Assembly Election 2022 BJP

‘सोझा लोबो’ रेस्टॉरंट हल्ला प्रकरणाला स्थानिक पोलिसांचा छुपा पाठिंबा..

सावळ यांचा प्रचार

माजी आमदार नरेश सावळ हे पुन्हा एकदा मगोच्या उमेदवारीवर आपले भवितव्य आजमावणार आहेत. त्यांनी मतदारसंघात प्रचारकार्यही सुरू केले असून, प्रचाराची पहिली फेरीही पूर्ण केली आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीत नरेश सावळ यांचा विजय अवघ्या मतांनी हुकला होता. मात्र, यावेळी डिचोलीत ‘सिंहा’ची डरकाळी फोडण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. गत पालिका निवडणुकीत सावळ गटाचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. या नगरसेवकांसह मतदारसंघातील काही आजी-माजी सरपंच, पंच तसेच मगो कार्यकर्ते आणि समर्थक सावळ यांच्या प्रचारकार्यात सहभागी होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com