मांद्रेत रंगणार 'हाय व्होल्टेज' लढत

जीत आरोलकर, दयानंद सोपटेंसह पार्सेकरांचीही कसोटी : नऊ उमेदवार रिंगणात
Political Fight in Mandrem Constutuency
Political Fight in Mandrem ConstutuencyDainik Gomantak

पेडणे : मांद्रे मतदारसंघात हाय व्होल्टेज निवडणूक होण्याची चिन्हे असून भाजप, मगो, गोवा फॉरवर्ड-काँग्रेस तसेच आप, आरजी, शिवसेना आणि अपक्ष असे नऊ उमेदवार नशीब आजमावणार असून लढत 'हाय व्होल्टेज' बनत चालली आहे. मांद्रेतील लढतीकडे सर्वांचेच लक्ष असून, हा मतदारसंघ भाजप, मगो, गोवा फॉरवर्ड की अपक्ष उमेदवार करिष्मा दाखवणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. (Political Fight in Mandrem News Updates)

माजी मुख्यमंत्री तथा भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देऊन बाहेर पडलेले अपक्ष उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही जोरदार प्रचार चालवला आहे. गेली 29 वर्षे साधारण 6 निवडणुकीत भाजप म्हणजे पार्सेकर असे समीकरण होते.मात्र 2019 च्या पोटनिवडणुकीनंतर परिस्थिती पूर्णतः पालटली व या निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने मतदारांना चिन्हाची माहिती देण्याचे अवघड अन् कसोटीचे काम पार्सेकर यांच्या कार्यकर्त्यांना करावे लागत आहे.

भाजपचे दयानंद सोपटे प्रचारात सक्रिय असून गावोगावचे कार्यकर्ते व हितचिंतकांची फळी पूर्ण नेटाने कार्य करीत आहे.शिवाय पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत केलेला विकास ही त्यांची जमेची बाजू आहे.

Political Fight in Mandrem Constutuency
गोमंतकीय जनता भाजपला सत्तेपासून दूर करणार, पटोले यांचा दावा

पेडणे तालुक्यातील इस्पितळ, इलेक्ट्रॉनिक सिटी व पाणी प्रकल्प ह्या जनतेशी निगडित प्रकल्पाची कामे मार्गी लावण्याचे स्वप्न मतदारांना दाखवून पार्सेकर प्रचारात रंगत वाढवीत आहेत. ह्या प्रकल्पाचे श्रेय व अन्यायाची 'सहानुभूती' असल्याने मांद्रेत अपक्ष उमेदवार इतिहास रचणार असा दावा समर्थक व्यक्त करतात.

मगो तृणमूल युतीचे उमेदवार जीत आरोलकर यांनी प्रचारात बरीच आघाडी घेतली आहे. उदरगत संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मांद्रे मतदारसंघात बरेच कार्य केले आहे.

काँग्रेसने (Congress) यंदाच्या निवडणुकीत दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ पद्धतीने जागा गोवा फॉरवर्डच्या घशात टाकली आहे.त्यांची स्थिती वेगळी नाही अशीच मतदारांत चर्चा आहे.दीपक कलांगुटकर यांच्या कार्याची महती मतदारांत असली तरी त्यांना काँग्रेस नेत्यांचा अपवादात्मक पाठिंबा आहे.

काँग्रेसला अवघ्या महिन्यात पुन्हा सोडचिठ्ठी देत अपक्ष रिंगणात उतरलेले सतीश शेटगांवकर यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.

आपचे ॲड. प्रसाद शहापुरकर यांचा जाहीरनामा मतदारांना कितपत लुभावतो यावरच त्यांचे भवितव्य आहे.आरजीच्या उमेदवार सूनयना गावडे यांनी अल्पावधीतच गोवेंकरांची मने जिंकली आहेत, मात्र निवडून येण्याइतपत मतदार साथ देतील का, हे निकालातूनच दिसून येईल.

Political Fight in Mandrem Constutuency
'मुख्यमंत्र्यांचा पराभव करा, सगलानींना मंत्री बनवून साखळीचा विकास घडवा'

पक्ष सोडू नका सांगण्यास कुणीही आले नाही : पार्सेकर

आपल्याला मांद्रे मतादरसंघातील जनतेने उमेदवारी दिलेली आहे. आपल्याकडे कुणीही पक्ष सोडू नये, सांगण्यासाठी आले नाही,असे सांगून मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Pramod Sawant) आपल्याशी चर्चा केल्याचे खोटे सांगत होते, असे मांद्रेचे अपक्ष उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.

2022 ची निवडणूक म्हणजे निर्णायक निवडणूक ठरणार आहे. अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार आमदार म्हणून निवडून येतील आणि याच अपक्ष आमदारांचा सरकारात मोठा सहभाग असेल, असा विश्वास लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केला. राज्यात विविध मतदार संघातील जे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत, ते आपल्या सतत संपर्कात असून आम्ही सर्व अपक्ष उमेदवार मिळून गोव्यात एक नवा इतिहास घडवूया,असे त्यांनी सांगितल्याचे पार्सेकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com