गोवा मुक्त होताच राजकारणाला झाली सुरुवात

पोर्तुगीज गव्हर्नर वासाल द सिल्वा (Governor Vasal Silva ) यांनी शरणागतीच्या दस्तावेजावर सही करून ते भारतीय लष्कर (Army) प्रमुखांना दिले.
गोवा आणि राजकारण
गोवा आणि राजकारण Dainik Gomantak

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. परंतु त्यानंतर तब्बल 14 वर्षं गोव्याचा स्वातंत्र्यलढा सुरू राहिला.

1498ला पोर्तुगीज खलाशी 'वास्को द गामा' गोव्यात पहिल्यांदा गेले. गोव्यातून पोर्तुगीज सत्ता संपण्यासाठी 19 डिसेंबर 1961 हा पहिला दिवस उजाडला. 1947 ते 1961 दरम्यान गोव्यात काय काय झालं हे पाहण्यासाठी गोव्याच्या मुक्तीसंग्रामाविषयी जाणून घ्यायला पाहिजे.

भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु गोवा हा पारतंत्र्यात राहिला. गोवा मुक्त होण्यासाठी जवळ जवळ चौदा वर्षं गेली.

पूर्ण देश गुलामगिरीतून स्वतंत्र झाला पण पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून गोवा मुक्त होऊ शकला नाही. 1947 ला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला पण गोव्यातील जनतेने मोकळा श्वास घेतला नव्हता.

गोवा आणि राजकारण
"गोव्यातील राजकारण थर्ड क्लास"

मुक्ती संग्रामाची पहिली ठिणगी कशी पडली-

पोर्तुगीजांपासून गोवा मुक्त व्हावा यासाठी असंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने आपलं काम करत होते. पण गोवा मुक्ती संग्रामाची पहिली ठिणगी ही डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यामुळे पडली.

पोर्तुगीजा कडून गोव्यातील जनतेच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली लोहिया यांनी पपहिली. पण असे कोणतेही निर्बंध न मानणाऱ्या लोहिया यांनी 18 जून 1946 रोजी मडगाव येथे जाहीर सभा घेऊन जनतेला संबोधित केले या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आणि येथून गोवा स्वातंत्र्याला खरी सुरुवात झाली.

गोवा आणि गोमंतकीय राष्ट्रवादी पिढी

गोव्यात गोमंतकीय मातीतून एका नव्या पिढीचा उदय झाला, जी पोर्तुगीजांची सत्ता आणि सालाझारच्या हुकूमशाहीला जुमानत नव्हते

या गोमंतकीय राष्ट्रवादी प्रभाकर सिनारी, मनोहर आपटे उर्फ मोहन रानडे, बाळा मापारी, विश्वनाथ लवंदे यांसारख्या सशस्त्र क्रांतीचा मार्ग क्रांतिकारी कार्यकर्ते तसेच गावागावातून अनेक तरुण पुढे आले. आणि यातून 'आझाद गोमंतक दल'सारख्या सशस्त्र दलाची स्थापना करण्यात आली

महिलांचा सहभाग आणि बलिदान

गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महिलांचाही मोठ्या प्रमाणात आणि लक्षणीय सहभाग होता शेकडो महिलांनी या गोवा मुक्ती संग्रामात सहभाग घेतला होता आणि त्या नुसत्याच सहभागी न होता त्यांनी अनेक तुकड्यांचे नेतृत्व केले काही प्रसंगी हातात शस्त्र घेऊन महिला लढल्या

यामध्ये सुधा जोशी, सिंधुताई देशपांडे, कॉ. मालिनीबाई तुळपुळे, कमलाबाई भागवत, कमला उपासनी, प्रभा साठे, शांत राव या महिला लढ्यात अग्रेसर होत्या

स्वातंत्र्याचा दिवस उजाडला

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा गोवा स्वातंत्र्य जाणार नव्हता अनेक वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेरीस गोव्याला स्वातंत्र्य मिळायला हवे असे जनमानसात मत तयार होऊ लागले 1958 च्या आसपास पोर्तुगीज नामशेष व्हायला सुरुवात झाली असे लोकांमध्ये रुजण्यास सुरवात झाली आणि देशांतर्गत जनतेकडून पोर्तुगिजांवर बाव वाढू लागला

तसेच दिल्ली येथे झालेल्या गोमंतकीय बैठकीत देखील यांच्या विरोधात लष्करी कारवाई करावी या मागणीने जोर धरला परंतु ही मागणी यशस्वी होण्यासाठी जवळपास दोन वर्षाचा कालावधी गेला अशाच पोर्तुगीजांना या कारवाईबाबत चा अंदाज येऊ लागला त्यांना असे वाटू लागले की कोणत्या क्षणी भारतीय लष्कर गोव्यात येऊ शकते अशी पोर्तुगीजांना कुणकुण लागली यामुळे पणजी वास्को मडगाव म्हापसा या शहरांमध्ये संचारबंदी घोषित करण्यात आली

त्याकाळचे संरक्षण मंत्री कृष्ण मेनन हे लष्करी कारवाई साठी आग्रही होते पोर्तुगीजांची कोंडी करण्यासाठी भारतीय लष्कर आणि स्वातंत्र्यसैनिक यांना यश आले पत्रादेवी येथे स्वतंत्र सैनिकावर पोर्तुगीज सैन्याकडून गोळीबार करण्यात आला यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपला जीव गमावला

शेवटी 19 डिसेंबर 1961 च्या रात्री दहा वाजता पोर्तुगीज गव्हर्नर वासाल द सिल्वा यांनी शरणागतीच्या दस्तावेजावर सही करून ते भारतीय लष्कर प्रमुखांना दिले. पोर्तुगीजांच्या साडेचारशे वर्षांच्या गुलामगिरीतून गोवा मुक्त झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com