गोव्याच्या राजकारणात ममतांच्या पोस्टर्सची हवा सत्तेची दिशा बदलणार का?

कारण ममता बॅनर्जींचे पहिले टार्गेट राहुल गांधी (Rahul Gandhi) नसून पंतप्रधान मोदी (PM Modi) आहेत.
गोव्याच्या राजकारणात ममतांच्या पोस्टर्सची हवा सत्तेची दिशा बदलणार का?

posters of Mamata Banerjee from Goa can give him the CM post

Dainik Gomantak

तुम्ही गोवा विमानतळावरून (Goa Airport) बाहेर पडताच, तृणमूल काँग्रेसचे (TMC) मोठे बॅनर्स तुमचे स्वागत करतात. या बॅनर्समध्ये पक्षाच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांचा हसरा चेहरा दुरूनच दिसतो. या छोट्या राज्याच्या कानाकोपऱ्यात असे असंख्य बॅनर्स आणि पोस्टर्स आपल्या सहज नजरेस पडतात. यातच ‘गोयंची नवी सकाळ’ या निवडणुकीच्या घोषणांनी राज्याला उज्ज्वल भविष्याचे आश्वासन दिले आहे. जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात निवडणुकीचे (Goa Election) वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाबसोबतच या किनारपट्टीच्या राज्यातही आगामी महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत.

गेल्या वेळी निवडणूक तिरंगी होती

यावेळी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्षातील काँग्रेस या बड्या पक्षांच्या जोडीने बंगालची तृणमूल काँग्रेस रिंगणात उतरली आहे. याशिवाय गोव्यातील स्थानिक नवीन पक्ष 'रिव्होल्युशनरी गोवान्स' पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी माध्यमांशी बोलताना कबूल केले होते की, यावेळची गोवा विधानसभा निवडणूक थोडी वेगळी असणार आहे. कारण यावेळी बाहेरून गोव्यात जास्त पक्ष येत आहेत. गेल्या वेळी निवडणूक तिरंगी होती. यावेळी चार-पाच पक्षांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.

<div class="paragraphs"><p>posters of Mamata Banerjee from Goa can give him the CM post</p></div>
गोव्यात सुरु असलेल्या आयाराम-गयारामांच्या खेळाचं मूळ हरियाणामध्ये

टीएमसीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा

40 जागांच्या गोवा विधानसभेच्या निवडणूकीच्या (Goa Assembly Election) निकालाचा राष्ट्रीय राजकारणावर परिणाम होऊ शकतो, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील (TMC) ने गेल्या वर्षी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तिसरा विजय नोंदवल्यानंतर त्रिपुरा आणि गोव्यात राजकीय हालचाल वाढवली आहे. काँग्रेसच्या जागी पर्यायी शक्ती म्हणून उदयास येण्याचे तृणमूल पक्षाचे उद्दिष्ट आहे. पक्षाने गोव्याच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी यूती केली आहे आणि गोवा विधानसभेच्या सर्व 40 जागांसाठी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतून एक गोष्ट निदर्शनास येतेय, एक म्हणजे टीएमसीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळतील. मग हा त्यांच्यासाठी मोठा विजय असेल आणि दुसरे म्हणजे टीएमसीचा विजय. कारण ममता बॅनर्जींचे पहिले टार्गेट राहुल गांधी (Rahul Gandhi) नसून पंतप्रधान मोदी (PM Modi) आहेत.

बदलाची मागणी

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लुइझिन फालेरो, एमजीपीचे माजी आमदार लवू मामलेदार, काँग्रेसचे सरचिटणीस यतीश नाईक आणि विजय पोई आणि गोव्याचे एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाओ यांच्यासह काही प्रमुख चेहरे टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. टेनिसपटू लिएंडर पेस देखील टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. गेल्या महिन्यात ममता बॅनर्जी गोव्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या तेव्हा 40 हून अधिक नेते पक्षात सामील झाले होते. पण महिन्याच्या शेवटी, माजी आमदार लवू मामलेदार यांच्यासह पाच प्राथमिक सदस्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्याचबरोबर भाजप सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरले असून, बेरोजगारी आणि महागाईमुळे अनेक संकटांना भाजपला तोंड द्यावे लागत आहेत. गोव्यातील अनेक लोकांनी बदल हवा आहे मात्र अजूनही गोव्यात भाजपच वचचढ असल्याचे दिसत आहे.

<div class="paragraphs"><p>posters of Mamata Banerjee from Goa can give him the CM post</p></div>
गोव्यात निवडणुका पुढे ढकलणं भाजपला पडू शकतं महागात

आम आदमी पार्टीची शक्यता

गोव्यात आम आदमी पक्षाचाही प्रचार जोरात सुरू आहे. गोव्यातील सभांमध्ये घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित करत पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीच्या विकासाचे मॉडेल गोव्यात आणणार असल्याचे सांगत आहेत. गोव्यातील जनतेला बदल हवा आहे. पण असे असतांना गोवेकर ते आम आदमी पार्टी आणि टीएमसीला बाहेरचे पक्ष मानतात. गोव्यातील तरुणांमध्ये एक नवीन स्थानिक पक्ष लोकप्रिय होताना दिसत आहे. चार वर्षांपूर्वी आम आदमी पक्षाच्या गोवा शाखेच्या पोटातून जन्माला आलेला रिव्होल्युशनरी गोवान्स पक्ष 'बाहेरच्यांच्या' विरोधाच्या जोरावर निवडणूक लढत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.