गोव्यात भाजपला सुरुंग! राजेश पाटणेकरांची निवडणुकीतून माघार

“मी पक्षाला कळवले आहे की मला आरोग्याच्या कारणास्तव निवडणूक लढवायची नाही. पक्षाचे तिकिट कोणत्याही उमेदवाराला दिले तरी मी त्याच्यासाठी मनापासून काम करेन,'' असं पाटणेकर यांनी सांगितले.
Rajesh Patnekar
Rajesh PatnekarDainik Gomantak

देशात आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये गोवा राज्याचा समावेश आहे. राज्यातील राजकारण मागील काही दिवसांपासून राजकीय रणधुमाळीमुळे गाजू लागले आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. याच पाश्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांनी 14 फेब्रुवारी रोजी होणारी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले आहे. यानंतर भाजपने अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (Maharashtrawadi Gomantak Party) संभाव्य उमेदवार नरेश सावळे यांच्याशी संपर्क साधला आहे. भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी त्यांना आग्रह धरला आहे. परंतु त्यांनी भाजपची (BJP) ऑफर नाकारली आहे.

दरम्यान, “मी पक्षाला कळवले आहे की मला आरोग्याच्या कारणास्तव निवडणूक लढवायची नाही. पक्षाचे तिकिट कोणत्याही उमेदवाराला दिले तरी मी त्याच्यासाठी मनापासून काम करेन,” असं पाटणेकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

Goa Assembly Election 2022: आम आदमी पक्षाची चौथी उमेदवार यादी जाहीर

तसेच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) आणि पक्षाचे सरचिटणीस सतीश धोंड यांनी सावल यांना एमजीपीमधून बाहेर पडण्यासाठी गळ घातली आहे. तर राज्याचे प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी शेट्ये यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

मात्र “मला माझी प्रतिमा खराब करायची नाही म्हणून मी भाजपचा प्रस्ताव नाकारला आहे. मी सदैव डिचोलीच्या जनतेबरोबर असणार आहे,” असं सावल यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

Rajesh Patnekar
Goa Election: भाजपची पहिली उमेदवार यादी 16 जानेवारीला जाहीर होणार?

दुसरीकडे, शेट्ये यांनीही समर्थकांशी चर्चा करुन भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

“मी भाजपचा प्रस्ताव नाकारला आहे. मला माझ्या समर्थकांसोबत राहून नैतिक राजकारण करायचे आहे. मी मतदारसंघातील गरीब लोकांच्या उन्नतीसाठी काम करेन, ज्यांना आतापर्यंत दुर्लक्षित केले गेले आहे, ”शेट्ये यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

दरम्यान, भाजपला आपल्या बालेकिल्ल्यात योग्य उमेदवार मिळू न शकल्याने राजकीय निरीक्षकही अचंबित झाले आहेत.

Rajesh Patnekar
Goa Election 2022: मगोप उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार?

"हे धक्कादायक आहे की, डिचोलीममध्ये मजबूत संघटनात्मक सेटअप असलेल्या पक्षाने अद्याप उमेदवार निश्चित केलेला नसून उमेदवार आयात करण्यासाठी धडपडत आहेत," असल्याचे निरिक्षण राजकीय विश्लेषकाने नोंदवले आहे.

तर, पक्षाच्या उमेदवारीसाठी इतर कोणीही उमेदवार नसल्यामुळे माजी जिल्हा पंचायत सदस्य शिल्पा नाईक भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

शिवाय, पाटणेकर 2002 पासून डिचोलीमधून निवडून येत आहेत. 2012 मध्ये त्यांनी भाजपला रामराम ठोकला होता. आणि कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. पाटणेकर यांचा अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या सावळे यांनी पराभव केला होता.

Rajesh Patnekar
Assembly Election: निवडणूक आयोग आज अंतिम मतदार यादी जाहीर करणार

सावळे आणि शेट्ये यांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली

नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजप, सावळे आणि शेट्ये यांनी आपले पॅनेल उभे केले होते. मात्र, एका अपक्ष उमेदवाराच्या पाठिंब्याने पाटणेकर यांनी भाजपला 10 जागा मिळवून दिल्या. सावळे यांच्या पॅनलला तीन आणि शेट्ये यांच्या पॅनलला एक जागा मिळाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com