कोमुनिदाद जागेवर केलेल्या अतिक्रमण विरोधात RG उठवणार आवाज

वास्कोतून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रवेश केलेल्या दाजी साळकर यांनी येथील परप्रांतीयांची बोगस मतदार यादीत नावे टाकलेली असल्याचा खळबळजनक आरोप मनोज परब यांनी केला आहे.
Revolutionary Govans will raise their voice Against encroachment of foreigners on Komunidad site in Goa

Revolutionary Govans will raise their voice Against encroachment of foreigners on Komunidad site in Goa

Dainik Gomantak

गोव्या बरोबर मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी, सांकवाळ, झुआरी नगर, दाबोळी (Dabolim) व वास्कोत (Vasco) परप्रांतीयांनी कोमुनिदाद जागेवर केलेल्या अतिक्रमण विरोधात आवाज उठवणार आहे. गोव्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रिवॉल्यूशनरी गोवन्स (Revolutionary Goans) पक्ष सत्ता स्थापन केल्यास कोमुनिदाद जागेवर परप्रांतीयांनी अतिक्रमण केलेली जागा पुन्हा घेऊन येथील स्थानिक गोवा वासियांना देणार असल्याची ग्वाही रिवॉल्यूशनरी गोवन्स पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब (Manoj Parab) यांनी दिली.

<div class="paragraphs"><p>Revolutionary Govans will raise their voice Against encroachment of foreigners on Komunidad site in Goa</p></div>
Goa Election: गोव्यात भाजप हॅट्ट्रिकसह विजय नोंदवणार, भाजप सरचिटणीसांचा दावा

वास्को मुरगाव नगरपालिकेसमोर आयोजित रेवल्यूशनरी गोवन्स पक्षाच्या मुरगाव तालुक्यातील जाहीर सभेत मनोज परब उपस्थित जनसमुदायाला संबोधित करत होते. पुढे बोलताना परब म्हणाले की, मुरगाव तालुक्यातील पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा, मुरगावचे आमदार मिलिंद नाईक (Milind Naik) व वास्को येथील परप्रांतीयांची छटपूजा करणारे दाजी साळकर भाजपा (BJP) प्रेमी बनवून परप्रांतीयांची मतदार यादी वाढविण्यासाठी बेकायदेशीर कृत्ये करीत असल्याचा खळबळजनक आरोप मनोज परब यांनी येथील सर्व नेत्यावर केला. मंत्री गुदिन्हो याने खऱ्या अर्थाने कुठ्ठाळी साकवाळ येथे परप्रंतियासाठी कोमुनिदाद जागा देऊन परप्रांतीयांचे कैवारी झाले आहे. मंत्री गुदिन्हो याने कुठ्ठाळी विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी एका परप्रांतीयाला देण्याची घोषणा करूण आपणही परप्रांतीय असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. मंत्री माविन हे गोवा वासियांना दूर करून परप्रांतीयांना जवळ घेत असून यंदा दाबोळीत त्यांना मतदार योग्य धडा शिकविणार असल्याचा इशारा परब यांनी दिला. वास्कोचे माजी आमदार आल्मेदा याने कदबमधील वाहन चालक, कंडक्टर यांना कायमस्वरूपी न करता त्यांना तात्पुरती सेवा देऊन कामगारांवर अन्याय केला आहे. तसेच कदंबबात परप्रांतीयांची भरती करून गोवा (Goa) वासियावर अन्याय केला आहे. मुरगावचे आमदार मिलिंद नाईक कोळशाच्या बळावर आपली राजकीय (Goa Politics) पोळी शिजवली आहे. वास्को बरोबर मुरगाव वासियांना कोळसा प्रदूषणात घालून आमदार नाईक यांनी आपला राजकीय डाव साधला असल्याचा आरोप त्यांनी केला.

<div class="paragraphs"><p>Revolutionary Govans will raise their voice Against encroachment of foreigners on Komunidad site in Goa</p></div>
गोव्याचे पर्यावरण आणि समृद्ध संस्कृती धोक्यात

वास्कोतून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रवेश केलेल्या दाजी साळकर यांनी येथील परप्रांतीयांची बोगस मतदार यादीत नावे टाकलेली असल्याचा खळबळजनक आरोप मनोज परब यांनी केला आहे. उत्तर भारतीयांची छट पुजा करून दाजी साळकर यांने फक्त परप्रांतीयांच्या मतदारावर लक्ष केंद्रित केला आहे. मुरगांव मामलेदार कार्यालयाने साळकर यांने मतदान यादीत परप्रांतियांची बोगस नावे त्वरीत रद्द करावी, अन्यथा रेवल्युशनरी गोवन्स पक्ष हे कार्य आपल्या पद्धतीने करणार असल्याचा इशारा शेवटी मनोज परब यांनी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com