गोव्यात 'आलेमाव-गेलेमाव' संस्कृती संपवण्यासाठी शिवसेनाच हवी

पक्षाचं संघटन फक्त आयाराम आणि गयारामांनी मिळून बनत नाही. संजय राउतांचा अप्रत्यक्ष चर्चिल आलेमाव यांनाच चिमटा
गोव्यात 'आलेमाव-गेलेमाव' संस्कृती संपवण्यासाठी शिवसेनाच हवी
Sanjay Raut And Churchill AlemaoDainik Gomantak

गोवा विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहेत. याच पार्श्वभूमीवर गोवा राज्यातील राजकारणाच्या समीकरणात मोठे बदल होताना दिसत आहेत. काल 'भाजप'च्या 34 उमेदवारांची यादी जाहीर झाली. यातच शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस युती (Shiv Sena-NCP alliance) आज जाहीर करण्यात आली आहे. आणि स्वत: आदित्या ठाकरे या निवडणुकीचा (Goa Election 2022) प्रचार करणार असल्याचे राउत यांनी सांगितले.

Sanjay Raut And Churchill Alemao
सावित्री कवळेकरांनी उभारला सांगेत बंडाचा झेंडा!

या दरम्यान गोव्यातील पक्षांतराच्या मुद्यावरून राउत यांनी गोव्यातील आमदारांवर सडकून टिका केली. "पक्षाचं संघटन फक्त आयाराम आणि गयारामांनी मिळून बनत नाही. त्यासाठी काम करावं लागतं. आयाराम गयाराम असतात तसेच गोव्यात आलेमाव-गेलेमाव आहेत. गोव्यात 'आलेमाव, गेलेमाव' संस्कृती संपवण्यासाठी शिवसेनाच हवी," असे विधान करत शिवसेना खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांनी अप्रत्यक्ष पक्षांतरन करणाऱ्या चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनाच चिमटा काढला आहे. 'सर्वच पक्षांनी आत्मचिंतन करावं आणि आपल्या उमेदवार यादीवर नजर टाकावी. आम्ही गोव्याच्या अस्मितेच्या रक्षणासाठी आणि स्थानिकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावे म्हणून आले आहोत,' असे मत आज संजय राउत यांनी पणजीमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Sanjay Raut And Churchill Alemao
गोव्यात शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर

महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात महाविकास आघाडी स्थापन करण्याचा राउतांचा प्रयत्न गोव्यात सफल झाला नाही. मात्र काँग्रेसच्या शून्य भूमिकेमुळे आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही युतीमध्ये काही रस नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीचे (NCP) नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत संजय राऊत यांची महत्त्वपूर्ण बैठक काल गोव्यात झाली. आज गोवा निवडणुकीच्या फॉर्म्युल्याबाबत शिक्कामोर्तब झाला असून शिवसेनेची उमेदवार यादीही जाहीर झाली आहे. संजय राऊत यांनी गोव्यात आम्ही जास्त जागांवर निवडणूक लढवणार नाही, असे विधान केले होते मात्र आता 8 जागा गोव्यातून शिवसेना लढणार आहे. तेव्हा गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये (BJP) चुरशीची लढत तर पहायला मिळेलच त्याचबरोबर शिवसेना, आप, तृणमूल यांचीही तिहेरी लढत गोवेकरांना येत्या काळात बघायला मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.