...पण गोव्याच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या डोक्यात काय वळवळतंय?

गोव्यात महाविकास आघाडीचा प्रस्तावाबाबत राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) सकारात्मक
...पण गोव्याच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या डोक्यात काय वळवळतंय?
Goa Congress PartyDainik Gomantak

गोवा विधानसभा निवडणूकीत आपली छाप पाडण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश आल्यानंतर गोवा विधानसभा निवडणुक रिंगणातही शिवसेना आणि राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. मात्र गोवा काँग्रेसने (Congress) स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पी. चीदंबरम यांनी इतर पक्षांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कॉंग्रेसच्या या वक्तव्यावर शिवसेनेची काय भूमिका आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आणि आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आच मुद्यावर भाष्य केले.

Goa Congress Party
'कॉंग्रेसने अकार्यक्षम मानलेले मायकल लोबो आता कार्यक्षम कसे झाले?'

राष्ट्रीय पातळीवरील चर्चेत काँग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) याबाबत सकारात्मक आहेत, मात्र स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या डोक्यात काय वळवळतंय याची कल्पना नाही, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोवा कॉंग्रेसला लगावला आहे. गोव्यात 40 पैकी 30 जागा तुम्ही लढा. 10 आम्हाला राष्ट्रवादीला आणि मगोपला एकत्रितपणे द्या असा प्रस्ताव कॉंग्रेसला दिला होता. पण गोव्यातल्या स्थानिक नेत्यांना प्रचंड आत्मविश्वास आहे. त्यामुळे त्यांचे काय मत आहे याविषयी सध्या कोणतीही माहिती नसल्याचे शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

काय म्हणाले संजय राऊत?

‘आम्ही काही झोळी घेऊन उभे नाहीत त्यांच्यापुढे. आम्ही फक्त राहुल गांधींसमोर प्रपोझल ठेवल आहे. महाराष्ट्रात आपण एकत्र आहोत, गोव्यातही एकत्र लढू असा प्रस्ताव मी त्यांच्यापुढे ठेवला आहे. राहुल गांधींशी (Rahul Gandhi) चर्चा झाली तेव्हा ते याबाबत सकारात्मक आहेत. पण स्थानिक काँग्रेस नेतृत्वाच्या डोक्यात काय वळवळतंय, माहिती नाही, असे संजय राऊत म्हणाले. खर तर गोव्यात कॉंग्रेसने नेतृत्व आणि निर्णयक्षमता गमावली की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

Goa Congress Party
उमेदवारीसाठी निकष महत्त्वाचे म्हणत फडणवीसांनी चारली पर्रीकरांच्या मुलाला धूळ

राऊत यांचा काँग्रेससमोर काय प्रस्ताव?

संजय राऊत यांनी गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) कशा प्रकारे उमेदवारी द्यायची याविषयीचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला आहे. "आम्ही काँग्रेसला 40 पैकी 30 जागा तुम्ही लढा, उर्वरीत 10 जागांवर मित्रपक्ष- राष्ट्रवादी, शिवसेना असे तीन पक्ष लढू. गोव्यात ज्या जागांवर काँग्रेस याआधी कधीच जिंकू शकली नाही, त्या जागा आम्ही मागितल्या होत्या. खिशातलं काही मागितलं नाही. आज काँग्रेसकडे तीन आमदारही नाहीत. होते ते सगळे पळून गेले. काँग्रेस सिंगल डिजिटमध्येही येणार नाही. आमच्यासारखे पक्ष काँग्रेसला आधार देत आहेत. पण स्थानिक नेत्यांच्या डोक्यात काय चाललंय याची माहिती नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com