गोव्यातील राष्ट्रवादी नेत्यांना पवारांनी दिला सल्ला

फक्त 24 तास वाट पहा, गोव्यात काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात निवडणुकीसाठी युती होणार की नाही हे स्पष्ट होईल
गोव्यातील राष्ट्रवादी नेत्यांना पवारांनी दिला सल्ला
गोव्यातील राष्ट्रवादी नेत्यांना पवारांनी दिला सल्लाDainik Gomantak

मडगाव: फक्त 24 तास वाट पहा, गोव्यात काँग्रेस (Congress)राष्ट्रवादी (NCP) यांच्यात निवडणुकीसाठी (Goa Election) युती होणार की नाही हे स्पष्ट होईल, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गोव्यातील (Goa) पक्षनेत्यांना दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी आज ‘गोमन्तक’ला ही माहिती दिली. डिसोझा हे आज दिल्लीला जाणार होते. मात्र आता हा निरोप मिळाल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला आहे.

गोव्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात युती होणार हे जवळपास नक्की झाले आहे. फक्त सोनिया गांधी यांच्याकडून त्याला हिरवा कंदील मिळण्याची वाट दोन्ही पक्षांचे नेते पाहत आहेत. काल राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांची याबाबत काँग्रेसचे दिनेश गुंडू राव यांच्याशी बोलणी झाली असून राव यांनी नंतर राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली.

गोव्यातील राष्ट्रवादी नेत्यांना पवारांनी दिला सल्ला
दिल्लीतील काँग्रेस प्रमुखांशी झालेल्या बैठकीनंतर सरदेसाई गोव्यात दाखल

माझ्या काही अटी

माझ्या काही अटी आहेत, त्या मान्य झाल्या नाहीत, तर मी माझा निर्णय घेण्यास मोकळा आहे, असे चर्चिल यांनी आज स्पष्ट केले. त्यांनी यापूर्वी स्वतःला बाणावलीत तर आपल्या मुलीला नावेलीत उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांची ही अट राष्ट्रवादीने अमान्य केली होती. पण पुन्हा त्यांनी तृणमूलशी चर्चा सुरू केली.

काँग्रेस- राष्ट्रवादी युतीला दोन्ही बाजूनी तत्त्वतः मान्यता यापूर्वीच मिळालेली आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला किमान 10 जागा सोडाव्यात, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे.

- चर्चिल आलेमाव, आमदार

गोव्यातील राष्ट्रवादी नेत्यांना पवारांनी दिला सल्ला
‘कदंब’कडे येणार आणखी 100 इलेक्ट्रीक बस

‘ती’ सदिच्छा भेट : चर्चिल आलेमाव व त्यांची कन्या वालांका यांनी दोन दिवसांपूर्वी कोलकत्याला जाऊन तृणमुलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्यानंतर चर्चिल तृणमुलमध्ये जाणार असे वृत्त सगळीकडे पसरले होते. मात्र, ती सदिच्छा भेट होती असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com