शिवसेना गोव्यात लढवणार 22 जागा

खासदार संजय राऊत गोव्याच्या दौऱ्यावर येत असून ते कुणाशी संधान साधायचे याबाबत निर्णय घेतील,
Shivsena Will fight 22 seats in Goa assembly elections
Shivsena Will fight 22 seats in Goa assembly electionsDainik Gomantak

पणजी: राज्यातील एकूण 22 जागांवर शिवसेना निवडणूक लढविणार असल्याची माहिती राज्यप्रमुख जितेश कामत यांनी पत्रकारांना दिली. लवकरच खासदार संजय राऊत हे गोव्याच्या दौऱ्यावर येत असून ते कुणाशी संधान साधायचे याबाबत निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, राज्यात सरकारने सर्वच क्षेत्रात खेळखंडोबा चालविला आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ढिसाळ नियोजन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. राज्यातील पत्रकारांना जी वागणूक उद्घाटन समारंभात दिली गेली ती निषेधार्ह आहे. शिवसेनेने राज्यात कधीच बॅनरबाजी केली नाही. पण, लोकांना वेळोवेळी मदत करण्यात कसूर केलेली नाही. त्यामुळे 14 ते 15 मतदार संघात आमचे प्राबल्य आहे. त्या मतदारसंघात कुणी आम्हाला स्थान देत असल्यास युती करण्याची तयारी आहे, अन्यथा स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार.

Shivsena Will fight 22 seats in Goa assembly elections
पळवले जाण्याच्या भीतीपोटी ‘मगो’चे उमेदवार बेळगावात

कामत यांनी राज्यातील चित्रपटांना इफ्फीत विशेष स्थान नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. राज्यातील समस्या सोडविण्याऐवजी मुख्यमंत्री इफ्फीच्या नावाखाली मजा मारत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिवसेनेचा ‘बाण’ दिशाहीन

सध्या राज्यातील सर्वच पक्षांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. प्रत्येकाला कुणा ना कुणाशी संधान बांधायचे आहे; मात्र प्रत्येकाला त्यांचा ‘इगो’ आड येत आहे. त्यामुळेच अद्याप एकाही पक्षाने युतीबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. आता शिवसेनादेखील स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची भाषा करू लागली आहे. 14 मतदार संघातील जागा दिल्यास आम्ही कोणत्याही पक्षाशी युती करू, असे राजाध्यक्ष जितेश कामत म्हणतात. त्यावर कडी म्हणजे याबाबतचा निर्णय केवळ खासदार संजय राऊत घेणार असल्याचेही तेच सांगतात. त्यामुळे शिवसेनेची नौका भरकटली तर नाही ना, असा संशय येतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com