उत्पल पर्रिकरांना शिवसेनेचा पाठिंबा: संजय राऊत

मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ते जर बाहेर पडले आणि पणजीतुन निवडणुकीला उभे राहिले तर गोव्यातील जनता त्यांच्या मागे उभी राहिल.
उत्पल पर्रिकरांना शिवसेनेचा पाठिंबा: संजय राऊत
Goa Legislative Assembly Election 2022Dainik Gomantak

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मोठे नेते, भाऊसाहेब बांदोडकरांनंतर गोव्यावर प्रभाव असलेला माणूस. त्यांच्या मृत्यूनंतर उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) राजकारणात येतोय. पण त्यांचा अपमान केला जातोय. उत्पल यांनी विधानसभा निवडणुकीत (Goa Legislative Assembly Election 2022) राजकीय पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या उमेदवारीला शिवसेना पाठिंबा देण्यास तयार आहे.

Goa Legislative Assembly Election 2022
बाबू आणि भाजपची ‘थिंक टँक’; खरी कुजबूज!

पुढचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. हिंमत दाखवायला हवी, चार भिंतीत बसून लढाई होत नाही. लढायच असेल तर समोर या आम्ही त्यांच्यासोबत आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ते जर बाहेर पडले आणि पणजीतुन निवडणुकीला उभे राहिले तर गोव्यातील जनता त्यांच्या मागे उभी राहिल.

शिवसेना त्यांना सर्वोतोपरी मदत करेल, ते सांगितील ती मदत शिवसेना करेल. आमच्यासोबत इतरही अनेक जण मदत करतील. मनोहर पर्रिकर मोठे नेते, राजकारणापलिकडील नेते होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील कोणावर अन्याय होत असेल, ते धाडसाने पुढे येवून काही करणार असतील तर शिवसेना आणि इतर समाजही त्यांना मदत करेल. पुर्णपणे पाठिंबा देत संजय राऊतांनी उत्पल पर्रिकरांना निवडनुकीसाठी हात पुढे केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com