मांद्रेतून सोपटेंची उमेदवारी फिक्स

रस्सीखेच : पार्सेकरांचेही शक्तिप्रदर्शन; फडणवीसांकडून (Devendra Fadnavis) मेळाव्यात सबुरीचा सल्ला, भाजपमध्ये (BJP) निवडणुकांच्या उमेदवारीची घोषणा केंद्रीय पातळीवरून होते.
भाजपमध्ये (BJP) निवडणुकांच्या उमेदवारीची घोषणा केंद्रीय पातळीवरून होते.
भाजपमध्ये (BJP) निवडणुकांच्या उमेदवारीची घोषणा केंद्रीय पातळीवरून होते. Dainik Gomantak

पणजी: आपण उमेदवारीचा विचार न करता या मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून यावे यासाठी प्रयत्न करावेत असे सांगताना पक्षात  गुण्यागोविंदाने रहा असा सबुरीचा सल्ला भाजपचे निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मांद्रे येथे दयानंद सोपटे (Dayanand Sopte) यांना दिला. मांद्रे मतदारसंघात भाजपच्यावतीने भाजप (BJP) कार्यकर्त्यांच्या जनसंपर्क अभियानात ते बोलत होते. फडणवीस यांच्या या उद्‌गारांमुळे या मतदारसंघातून सोपटे यांना उमेदवारीच जाहीर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  

ते म्हणाले, भाजपमध्ये निवडणुकांच्या उमेदवारीची घोषणा केंद्रीय पातळीवरून होते. अगदी मुख्यमंत्र्यांची उमेदवारीसुद्धा. याला अपवाद असत नाही म्हणून त्यांना उमेदवारी मिळणार नाही असे अजिबात नाही. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, गोरख मांद्रेकर, मधु परब, संतोष कोरखणकर, नयनी शेटगावकर, तारा हडफडकर, दीपा तळकर, प्राजक्ता कान्नायिक, एकता चोडणकर, पान १ वरून

भाजपमध्ये (BJP) निवडणुकांच्या उमेदवारीची घोषणा केंद्रीय पातळीवरून होते.
Goa: नवा विक्रम करणार अशी घोषणा करावी; देवेंद्र फडणवीस

मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर, उपसरपंच अमित शेटगावकर, तुयेचे सरपंच सुहास नाईक, गोविंद आजगावकर, अनंत गडेकर, कविता तुयेकर, रामा नाईक, पार्सेच्या सरपंच प्रगती सोपटे, दत्ताराम ठाकूर, अनिशा केरकर, मधु कानोलकर, डेनिस ब्रिटो, राजन फरास, हरमलचे सरपंच मनोहर केरकर, बाबली राऊत, जिल्हा सदस्य मनोहर धारगळकर, शिल्पा नाईक, गुरुदास सोपटे, महानंदू अस्नोडकर, आगरवाड्याचे सरपंच भगीरथ गावकर, विर्नोड्याच्या सरपंच अपर्णा परब, तसेच नऊही पंचायत क्षेत्रातील उपसरपंच, पंच सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

दरम्यान, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वतीने जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी माजी मुख्यमंत्री आणि उमेदवारीसाठी इच्छुक लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून कार्यक्रमाचे नियोजन सुरू होते. मात्र, सोपटे यांच्या कार्यकर्त्यांना हे शक्तिप्रदर्शन वाटल्याने त्यांनी चार दिवसात भाजपच्या कार्यकर्त्यांना बोलवून आणि त्याच नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा केला. भाजपमधील २ इच्छुक उमेदवारांचे हे एकप्रकारे शक्तिप्रदर्शन होते अशी चर्चा होती. त्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन झाले. मात्र, या शक्तिप्रदर्शनात बाजी मारली ती दयानंद सोपटे यांनी.

मांद्र्याच्या दीनदयाळ सभागृहामध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला मोठी गर्दी जमविण्यात सोपटे यशस्वी झाले. यावेळी पक्षातील आपले राजकीय विरोधक माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यावरच तोफ डागत आपले भाषण केवळ पार्सेकर यांच्यावरच केले. एकप्रकारे हा पक्षातील शह-काटशहाचाच भाग होता.

घाबरायची गरज नाही : मुख्यमंत्री

निवडणूक प्रभारींनी विक्रमी मतांनी निवडून येण्यासाठी कामाला लागा असे सांगितल्याने ‘‘आता घाबरायची गरज नाही’ हा आपल्या नेहमीचा डायलॉग मारत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरीत्या सोपटे यांचे समर्थन केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर चौफेर टीका करत आप आणि तृणमूल, मगो पक्षावरही टीका केली. सध्या मगोचे प्रचार करणारे कधीही तृणमूलमध्ये जाऊ शकतात असा दावाही केला.

भाजपमध्ये (BJP) निवडणुकांच्या उमेदवारीची घोषणा केंद्रीय पातळीवरून होते.
गोव्यातील तीन बायका, फडणवीसांची फजिती ऐका...

सोपटे ‘टास्क’मध्ये ठरले यशस्वी मतदारसंघातून विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना भाजपचा पाठिंबा असून हा मेळावा भाजपने चार दिवसात जाहीर करून सोपटे यांना एक प्रकारे टास्क दिला होता त्यात ते यशस्वी झाले. या मेळाव्याला मोठी गर्दी होती. दीनदयाळ सभागृह भरून शेकडो कार्यकर्ते बाहेर उभे होते.

पार्सेकरांच्या व्यासपीठावर सोपटे

मांद्रे येथील कार्यक्रम करून भाजप कार्यकर्त्यांनी हरमल गाठले तेथे सोपटे यांनी हजेरी लावली आणि व्यासपीठावरही स्थान मिळवले. यावर फडणवीस यांनी कोटी करत एकत्रित येण्याचा सल्लाही दिला. निमंत्रण पत्रिकेवर आमदार दयानंद सोपटे यांचे नाव नव्हते. मात्र, निमंत्रण पत्रिका त्यांना देण्यात आली व व्यासपीठावर आसनही देण्यात आले.

मी मांद्रे मतदारसंघात जॉईंट किलर म्हणून प्रसिद्ध आहे. याबरोबरच सर्वसामान्य माणसाची कामे करण्यासाठी कधीही मागे पुढे पाहात नाही. यापुढेही सामान्यांच्या कल्याणासाठी मी कार्यरत असेन.

- दयानंद सोपटे, आमदार, मांद्रे

भाजपमध्ये निवडणुकीसाठीची उमेदवारी ही केंद्रीय निवडणूक समितीमार्फत जाहीर केली जाते. त्यामुळे उमेदवारीबाबत सध्या न बोललेले बरे.

- प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री

मांद्रेकरही निश्‍चित

मांद्रे येथील कार्यकर्ता मेळाव्यात माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांची शिवोली मतदारसंघातील भाजप उमेदवारी निश्चित झाली असल्याची घोषणा सदानंद शेट तानावडे यांनी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत, सतीश धोंड उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com