'रिव्हॉल्युशनरी गोवन्समुळे मगोपचे मताधिक्य घटलं'

गोंय, गोंयकारपण मुद्यांवरच ‘आरजी’ला यश मिळाल्याचं सुदिन ढवळीकरांचं मत
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak

फोंडा : गोवा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. कारण उमेदवारांची संख्या वाढल्याने मते विभागली. या निवडणुकीत ‘आप’ तसेच रिव्हॉल्युशनरी गोवन्स या नव्या पक्षांच्या आमदारांनी विधानसभेत पाऊल टाकले. गोंय, गोंयकारपण हे विषय घेऊनच आरजीने कार्य केले. त्यामुळेच त्यांना हे यश संपादन करता आले. पण आरजीमुळे मगो आणि इतर पक्षांचे मताधिक्य घटले. मडकईतही ते जाणवले, असे मत सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केलं आहे. फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गोवा विधानसभेतील परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

Sudin Dhavalikar
...म्हणून गोव्यात सत्तास्थापनेला विलंब, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

स्पष्ट बहुमत नसल्यामुळे अनेक राजकीय पक्षांना सत्तेसाठी चाचपडावे लागले. मगोपने पुन्हा एकदा विधानसभेत अस्तित्व सिद्ध केले; पण अपेक्षेप्रमाणे यश संपादन केले नाही, त्याची पूर्ण जबाबदारी घेत असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. मगोपला गोमंतकीयांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभारही त्यांनी व्यक्त केले.

कार्यकर्ते आणि मतदारांना या विजयाचे श्रेय जाते, असे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. मगो हा गोमंतकीयांचा पक्ष आहे. या पक्षाने कार्यकर्ते घडवले, उमेदवार घडवले पण इतरांनी ते नेले. आताही मगो (MGP) पक्षाच्या मुशीत तयार झालेले; पण भाजपमध्ये (BJP) जाऊन आमदार झालेले पेडणे आणि मयेचे विद्यमान आमदार हे खरे म्हणजे मगोचे उमेदवार असूनही त्यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. त्या दोघांचेही अभिनंदन करताना सुदिन ढवळीकर यांनी या दोघांनी आणखी पक्षांतर करू नये, असा सल्लाही दिला.

Sudin Dhavalikar
कुडतरीच्या विकासासाठीच भाजपला पाठिंबा : आलेक्स

डिचोलीत नरेश सावळ तसेच फोंड्यात केतन भाटीकर यांनी बराच काळ चांगले कार्य केले आहे. त्यांच्या कामाचे कौतुकही झाले; पण त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकले नाही. फोंडा, प्रियोळ मतदारसंघात उमेदवारांच्या नातेवाईकांमुळेच मते घटली. फोंडा आणि प्रियोळ या दोन्ही मतदारसंघांत मगोचे प्रतिनिधित्व निश्‍चित होते; पण स्वकियांमुळे मगोचे आमदार निवडून येऊ शकले नाही, असे ढवळीकर (Sudin Dhavalikar) म्हणाले.

मतमोजणी झाल्याबरोबरच मगोपने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी संपर्क साधल्यानंतर हा मगो पक्षातर्फे निर्णय घेण्यात आला असून मगोपच्या कार्यकारिणीलाही विश्‍वासात घेण्यात आले असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com