गोव्यात स्वबळावर सत्ता मिळविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसला कार्यकर्तेच मिळेनात

व्हिटामिन ‘एम’ची कमतरता;काँग्रेसला (Congress) मिळेनात कार्यकर्ते, केडरचा अभाव, भाजपचा (BJP) पराभव करून सत्तेवर कसा येणार?
गोव्यात स्वबळावर सत्ता मिळविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसला कार्यकर्तेच मिळेनात
काँग्रेसला (Congress ) मिळेनात कार्यकर्तेDainik Gomantak

पणजी/कळंगुट: भाजपचा (BJP) पाडाव करून एकहाती सत्ता मिळवण्याची स्वप्ने कॉंग्रेस पक्ष (Congress party) पाहात असला तरी सध्या या पक्षाचा कार्यक्रम लोकांपर्यंत नेण्यासाठी कार्यकर्त्यांची (activists) प्रचंड चणचण भासत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास निवडून येण्याची क्षमता हा एकमेव निकष वापरून त्या पक्षाची तिकीट विक्री सुरू होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

काँग्रेसला (Congress ) मिळेनात कार्यकर्ते
'तरच आपण भाजप आणि आरएसएस हरवू शकू', सोनिया गांधींचा काँग्रेस नेत्यांना कानमंत्र

कार्यकर्ते जमवणे आणि टिकवून ठेवण्यासाठी लागणारे व्हिटामिन ‘एम’ कुणी बाहेर काढायचे, या प्रश्नाचे उत्तर कॉंग्रेसला अद्यापही सापडलेले नाही. गट समित्यांवर अध्यक्ष म्हणून वर्णी लागलेल्यांनी तिकिटाची अपेक्षा धरू नये, असे केंद्रीय नेते पी. चिदंबरम यांनी आधीच सांगून टाकले आहे. त्यामुळे विनाकारण पदरमोड करून कार्यकर्ते गोळा करण्यात गट अध्यक्षांना स्वारस्य राहिलेले नाही. म्हणजेच तिकिटासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते तेच पक्षाचे कार्यकर्ते, असे समीकरण बनले आहे.

पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते नसल्यामुळेच आमदार निर्धास्तपणे फुटतात, हे माहीत असूनही कॉंग्रेसने कार्यकर्ता केडर उभारण्याचे मनावर घेतलेले नाही. कळंगुट येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या सभेत याचा प्रत्यय आला. कळंगुट मतदारसंघ भाजपकडून खेचून घेण्याची भाषा कॉंग्रेस बोलत आहे. माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, कळंगुटचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा आणि अँथनी मिनेझिस असे तीन मातब्बर उमेदवार या पक्षाकडे असूनही पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्यांची संख्या आहे जेमतेम १९५. चिदंबरम यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत याचा उल्लेख करत इतक्या कमी कार्यकर्त्यांनिशी मतदान केंद्रांचे व्यवस्थापनदेखील शक्य नसल्याची खंत व्यक्त केली. कार्यकर्त्यांची संख्या वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले खरे पण; व्यासपीठ आणि प्रेक्षागाराकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. कळंगुटसारख्या मतदारसंघात ही अवस्था, तर अन्यत्र काय परिस्थिती असेल, याची कल्पनाच करवत नसल्याची प्रतिक्रिया एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने दिली.

काँग्रेसला (Congress ) मिळेनात कार्यकर्ते
आप आणि तृणमूल काँग्रेस गोव्याच्या निवडणुकीत 'फक्त नावाचे खेळाडू': चिदंबरम

पक्षाने संघटना उभारणीसाठी हात मोकळा सोडलेला नाही, असेही कार्यकर्त्यांची चणचण सांगते. पी. चिदंबरम यांनीही यासंदर्भात मौन बाळगले आहे. स्थानिक नेत्यांनी कार्यकर्ते पुरवायचे; पण तिकिटाची हमी नाही, असेच अघोषित धोरण चिदंबरमही राबवत असल्याने पदरमोड करण्याची कुणाचीही तयारी नाही. भाजपविरोधी वातावरण राज्यात असले तरी पक्षाने कार्यकर्त्यांची फळी उभारण्यासाठी अशीच उदासीनता दाखवल्यास निवडणुकीत मतदान केंद्रावर बसण्यासाठीही माणसे मिळणार नाहीत, अशी अस्वस्थ कुजबूज उर्वरित कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

सोम्या-गोम्याही बनले समाजसेवक

विधानसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. वर्षाआधी कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कुटुंबीयांसमवेत दरवाजाआड लपून बसलेले सोम्या-गोम्यासुद्धा सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका रात्रीत समाजसेवक बनून तन -मन आणि धनानेही लोकसेवेत गुंतल्याचे चित्र सर्वत्र दिसते आहे.

काँग्रेसला (Congress ) मिळेनात कार्यकर्ते
काँग्रेस-राष्ट्रवादीचे ठरले! गोव्यातही वाहू लागले महाविकासआघाडीचे वारे

खर्चाचा विषय येताच हास्य लुप्त

कांदोळीतील कार्यकर्त्यांच्या बैठकीत संभाव्य उमेदवारांनी खर्च स्वत:च उभारण्याचे आवाहन केल्याने अनेकांच्या तोंडावरचे हास्य लुप्त झाल्याची चर्चा आहे. या गोष्टीचा वेगळा अर्थ काढताना चिदंबरम यांनी एकप्रकारे धनाढ्य लोकांनीच राज्यातील निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असा टोला स्थानिक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मारल्याचे कळते.

...तर लोबोंच्या पक्षप्रवेशाचा मार्ग सुकर

कॉग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते ते आग्नेलो फर्नांडिस, जोसेफ सिक्वेरा, ॲन्थनी मिनेझिस हे श्रीमंत कुटुंबातील असल्याने कदाचित त्यांनी निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाच्या फंडावर अवलंबून न राहाता स्वत:च्या खिशातील पैसा खर्च करण्यास तयार राहावे, असाही त्याचा अर्थ निघू शकतो. संभाव्य उमेदवारांकडून नकार घंटा ऐकू आल्यास उपाय म्हणून गर्भश्रीमंत लोबो यांना पक्षात प्रवेश दे्ण्यास पक्षश्रेष्ठी मोकळे असतील, असाही तर्क व्यक्त केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com