...म्हणून भाजपने यादी जाहीर करणं पुढे ढकललं

आता भाजपच्या (BJP) उमेदवारांची पहिली यादी 19 जानेवारीला तर दुसरी यादी 21 जानेवारीला जाहीर करण्यात येणार असल्याचे गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले आहे.
...म्हणून भाजपने यादी जाहीर करणं पुढे ढकललं
Sadanand Shet TanawadeDainik Gomantak

आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. यामध्ये गोवा राज्याचाही समावेश आहे. गोव्यात सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. याच पाश्वभूमीवर कॉंग्रेसह अन्य राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी केली आहे. मात्र गोव्यात सत्तेमध्ये असणारा भाजप उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार असं सातत्याने विचारलं जात होतं. मात्र आता भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी 19 जानेवारीला तर दुसरी यादी 21 जानेवारीला जाहीर करण्यात येणार असल्याचे गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी सांगितले आहे.

Sadanand Shet Tanawade
गोव्यात शिवसेनेचा एक ला चलो रे! काँग्रेसचा आघाडीला नकार

दरम्यान, उत्पल पर्रीकर यांच्यासह प्रियोळ, पेडणे, मतदारसंघात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे यादी लांबणीवर पडल्याची शक्यता असल्याचे राज्यातील राजकीय तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून पणजी मतदार संघामधून कुणाला उमेदवारी द्यावी यासंबंधी पेच निर्माण झाला आहे.

तसेच, भाजपकडून तिकीट न मिळाल्यास माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर पणजीमधून अपक्ष लढणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मागील काही दिवसांपासून पणजी मतदार संघ गोव्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू बनले आहे. उत्पल पर्रीकरांना शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. यातच उद्या जाहीर होणाऱ्या भाजपच्या यादीमध्ये उत्पल पर्रीकरांचे नाव नसल्याचे ते कोणत्या पक्षामध्ये जाणार किंवा विधानसभा निवडणूक अपक्ष लढवणार हे पाहाण आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com