येत्या निवडणुकीत 'कॉंग्रेसचा विजय' ही काळ्या दगडावरची रेघ : दिलायला लोबो

येत्या निवडणुकीत 'कॉंग्रेसचाच विजय' होणार असल्याचे प्रतिपादन दिलायला लोबो यांनी केले.
येत्या निवडणुकीत 'कॉंग्रेसचा विजय' ही काळ्या दगडावरची रेघ : दिलायला लोबो
दिलायला लोबोDainik Gomantak

Goa Election: शिवोली मतदार संघात यंदा केवळ बदलच नव्हे तर परिवर्तनाची लाट सुरु झालेली आहे. घरांघरांतील आया-बहिणी तसेच पुरुष मतदारांचा भरघोस पाठींबा आपल्याला मिळतो आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections 2022) कॉंग्रेसचा (Congress) विजय ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे स्पष्ट प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या दिलायला लोबो (Delilah Lobo) यांनी आंसगावात व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमवेत आंसगावचे सरपंच हनुमंत नाईक, उप-सरपंच रिया नाईक, पंच सदस्य क्षिरसागर नाईक तसेच पंचक्रोशीतील महिला तसेच युवा वर्ग  उपस्थित होता.

दिलायला लोबो
Youth Day: काँग्रेसचे नेते अमित पाटकर यांचा युवकांशी व्हर्चुअल संवाद

दरम्यान,शिवोली मतदार संघातील सडयें, ओशेल तसेच मार्ना- शिवोलीतील मतदारांचा आपल्याला भरघोस पाठींबा मिळालेला आहे आणि आतापर्यंत विकासापासून अत्यंत दूर मागासलेल्या अवस्थेत राहिलेल्या शिवोलीला (Siolim) कॉंग्रेस शिवाय पर्याय नसल्याचे दिलायला लोबो यांनी सांगितले. दरम्यान, आंसगावचे सरपंच हनुमंत नाईक शिवोलीचा मतदार आता जागृत झालेला असून समाजात तसेच गावात परिवर्तनाची लाट उफाळून आल्याचे सांगतानाच या लाटेत राजकीय प्रस्थांपीतांचा निश्चितच कडेलोट होणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. देशाच्या इतिहासात आतापर्यंत अनेक महिलांनी क्रांतीची ज्योत पेटवल्याची उदाहरणे आहेत. शिवोलीत दिलायला लोबो परिवर्तनाची लाट निश्चितच आणणार आहेत तसेच जुन्या खोडांना घरचा रस्ता दाखवणार असल्याचा आत्मविश्वास सरपंच नाईक यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com