बार्देशमध्ये भाजप-काँग्रेस संघर्ष तीव्र

मायकल लोबो यांनी आपल्या समर्थकांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे नक्की केल्यामुळे भाजपला मोठा हादरा बसला आहे.
बार्देशमध्ये भाजप-काँग्रेस संघर्ष तीव्र
there is unrest among all parties including Goa Forward in BardezDainik Gomantak

पणजी: बार्देश तालुक्यात राजकीय प्रभाव निर्माण करण्यासाठी एका बाजूला मायकल लोबो यांनी हालचाली चालवल्या असतानाच भाजपने आता आपल्या योजना पुढे रेटायला सुरवात केली आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्डसह सर्वच पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

मायकल लोबो यांनी आपल्या समर्थकांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे नक्की केल्यामुळे भाजपला मोठा हादरा बसला आहे. ही राजकीय धामधूम याच महिन्यात जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मायकल लोबो (कळंगुट) तसेच त्यांच्या पत्नी दिलायला लोबो (शिवोली) यांच्यासह रोहन खंवटे (पर्वरी) आणि तारक आरोलकर (हळदोणे) या लोबो समर्थकांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त आहे.

थिवी मतदारसंघाचे नेते किरण कांदोळकरपान यांनी आपल्या पत्नीसह दोघांनाही तिकीट मिळण्याच्या अटीवर तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने गोवा फॉरवर्डला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे थिवीमध्ये कॉंग्रेसला सध्या उमेदवारच सापडत नाही.

दरम्यान, आग्वाद तुरुंगाचे काम एका खासगी कंपनीला सोपवण्याच्या निर्णयाविरुद्ध मायकल लोबो यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतही जोरदार आवाज उठवला. मगोपनेही या निवडणुकीत भाजपबरोबर युती करण्यास नकार दिल्याने भाजपच्या अस्वस्थतेमध्ये आणखी भर पडली आहे. शिवाय कॅथलीक समाजामध्ये भाजपविरोधात तीव्र असंतोष आहे. त्यामुळे ख्रिस्ती आमदारांमध्येही ती अस्वस्थता जाणवते.

there is unrest among all parties including Goa Forward  in Bardez
मेघालयात ममता दीदींचा काँग्रेसला दे धक्का, 12 आमदारांचा तृणमुलमध्ये प्रवेश

जयेशना साळगावमध्ये भाजपची उमेदवारी?

भाजपने जयेश साळगावकर यांना साळगावमध्ये उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याचे वृत्त आहे. दिल्लीहून मिळालेल्या माहितीनुसार, जयेश यांना पक्ष प्रवेश देण्याचा निर्णय उच्च पातळीवर झाला. भाजपने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार जयेश यांनाच लोकांनी पसंती दिली आहे. कोकणचे नेते नारायण राणे यांनीही जयेश यांच्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडे शब्द टाकला असल्याची माहिती मिळाली आहे. या मतदारसंघात रूपेश नाईक, केदार नाईक हे अनुक्रमे जि. पं. सदस्य तसेच रेईश मागूशचे सरपंच असून या सर्वेक्षणात दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

there is unrest among all parties including Goa Forward  in Bardez
तीन वर्षांच्या मुलासमोर मजुराने घेतला गळफास

देवेंद्र फडणवीसांचा बार्देसवर वॉच

या घडामोडींमुळे गोवा फॉरवर्डचे बार्देशमधील अस्तित्व जवळजवळ संपुष्टात आले आहे. शिवोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार विनोद पालयेकर यांना सध्या कोणताच पक्ष विचारत नसल्याची स्थिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोव्यातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. फडणवीस यांच्याकडून त्यांना येथील राजकीय परिस्थितीचा अंदाज सतत सादर केला जातो. फडणवीस यांनी गोव्यातच तळ ठोकावा, अशा त्यांना सूचना आहेत. बार्देशमध्ये भाजपच्या अस्तित्वाला परिणाम झाल्यास सत्ताधारी पक्षातील निवडणुकीचे गणित फिसकटणार आहे. त्यामुळे भाजपने सध्या गंभीरपणे राजकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित केले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com