तृणमूल काँग्रेसकडून गोव्यातील मतदारांची दिशाभूल: सागर मुळवी

राज्यात तृणमूल काँग्रेसकडून लोकांची दिशाभूल करून मते मिळवण्यासाठी तृणमूल (TMC) आणि मगो (MGP) युतीने केलेला हा प्रयत्न मतदारच हाणून पाडतील, असे मडकई भाजप (BJP) मंडळाचे सागर मुळवी यांनी सांगितले.
Trinamool Congress misleads voters in Goa
Trinamool Congress misleads voters in GoaDainik Gomantak

फोंडा: राज्यात तृणमूल काँग्रेसकडून फसवी आश्‍वासने दिली जात असून लोकांची दिशाभूल करून मते मिळवण्यासाठी तृणमूल (TMC) आणि मगो (MGP) युतीने केलेला हा प्रयत्न मतदारच हाणून पाडतील, असे मडकई भाजप (BJP) मंडळाचे सागर मुळवी यांनी बांदोडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मडकई मतदारसंघात विद्यमान मगो आमदाराने कोणतीही विकासकामे केली नसल्याचाही दावा मडकई भाजप मंडळाने केला. यावेळी मडकई भाजप मंडळाचे प्रशांत नाईक, जयराज नाईक, दिनेश वळवईकर, उदय नाईक व सुदेश भिंगी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Trinamool Congress misleads voters in Goa
.. 'म्हणून' बांबोळीतील गाडेधारकांनी घेतला निर्णय

सागर मुळवी म्हणाले की, 'तृणमूल काँग्रेसकडून लोकांची फसवणूक चालली असून राज्यात गृहलक्ष्मी योजना तसेच उद्योग व्यवसायासाठी कमी व्याजात वीस लाख रुपये देण्याच्या घोषणा तृणमूल काँग्रेस करीत असले तरी खुद्द पश्‍चिम बंगालमध्ये सरकार असलेल्या तृणमूल काँग्रेसकडून अशाच अनेक फसव्या योजना काढल्या असून लोकांना उल्लू बनवले आहे. उदाहरणार्थ पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूलने कन्याश्री ही योजना लागू केली असली तरी विद्यार्थिनींना वार्षिक फक्त साडेसातशे रुपये दिले जातात', असेही सागर मुळवी म्हणाले. मडकई मतदारसंघात मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी कोणताच विकास केला नाही. मडकई मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले माजी मुख्यमंत्री रवी नाईक (Ravi Naik) यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात इस्पितळ, महाविद्यालय तसेच सभागृहे व इतर अनेक योजना आणि उपक्रम राबवले, असल्याचेही भाजपचे पदाधिकारी प्रशांत नाईक यांनी सांगितले. मडकईतून रवी नाईक यांनी निवडणूक लढवल्यास आम्ही स्वागतच करू असेही यावेळी सांगण्यात आले.

Trinamool Congress misleads voters in Goa
संदीप निगळ्‍ये अपक्ष निवडणूक लढवणार

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केलेले सुदेश भिंगी यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत मतांची चांगली टक्केवारी घेतली होती, त्यामुळे या निवडणुकीत आपण इच्छुक आहात काय, असे विचारल्यावर पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्विकारू, मात्र सर्वांना विश्‍वासात घेऊनच वाटचाल करणे आवश्‍यक असल्याचे नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com