खनिजाची 35 हजार कोटींची लूट वसूल करा

तृणमूलचे (Trinamool) नेते आणि टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paes) यांनी ‘गोमन्तक’शी साधला संवाद, गोव्यात (Goa) तृणमूल पंचसुत्रीवर काम करू.
खनिजाची 35 हजार कोटींची लूट वसूल करा
तृणमूलचे (Trinamool) नेते आणि टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paes) यांनी ‘गोमन्तक’शी साधला संवाद, गोव्यात (Goa) तृणमूल पंचसुत्रीवर काम करू. Dainik Gomantak

सुशांत कुंकळ्येकर

मडगाव: गोवा सरकारच्या (Government of Goa) नाकर्तेपणामुळे गोव्याच्या डोक्यावर 25 हजार कोटींचे कर्ज आहे, तर दुसऱ्या बाजूने खनिज कंपन्यांनी (Mineral companies) जी 35 हजार कोटींची लूट केली आहे ती वसूल करण्यासाठी हे सरकार काहीच करत नाही. ही लूट वसूल केली, तर गोव्याचे सर्व कर्ज फेडून सरकारला लोकोपयोगी कामासाठी 10 हजार कोटी अतिरिक्त पैसे मिळू शकतील, असे मत तृणमूलचे (Trinamool) नेते आणि आघाडीचे टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paes) यांनी व्यक्त केले.

तृणमूलचे (Trinamool) नेते आणि टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paes) यांनी ‘गोमन्तक’शी साधला संवाद, गोव्यात (Goa) तृणमूल पंचसुत्रीवर काम करू.
गोवा तृणमूल काँगेसने 'त्या' व्यंगचित्राबद्दल माफी मगावी

दै. ‘गोमन्तक’ला दिलेल्या खास मुलाखतीत लिएंडर पेस याने आपली मते खुलेपणाने मांडली. तो म्हणाला, गोवेकरांचे राहणीमान उंचावण्यासाठी या सरकारकडे मार्ग नाहीत असे नाही. त्यांच्याकडे ते जरूर आहेत, पण ते अमलात आणण्याची इच्छाशक्ती त्यांच्याकडे नाही. त्यामुळेच येथे बदल घडवून आणला पाहिजे. हा बदल घडवून आणण्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत.

गोव्यात तृणमूल पंचसुत्रीवर काम करू पाहात असून त्यात सर्वसमावेशक खनिज उद्योग, स्थानिकांना प्राधान्य असलेला मत्स्योद्योग, सर्वांना स्वच्छ पिण्याचे पाणी, विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात उच्च शिक्षण आणि सर्वांना रोजगार ही आमची उद्दिष्टे आहेत.

तृणमूलचे (Trinamool) नेते आणि टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paes) यांनी ‘गोमन्तक’शी साधला संवाद, गोव्यात (Goa) तृणमूल पंचसुत्रीवर काम करू.
Goa Election: ‘तृणमूल’च्या ‘एन्‍ट्री’ ने गणित बदलणार

मच्छिमारी उद्योगाबद्दल बोलताना लिएंडर म्हणाला, मी जो अभ्यास केल्याप्रमाणे मोठ्या मच्छिमारी बोटींनी खनिज कंपन्यांसारखीच लूट केल्याने गोव्यातील 85 टक्के मत्स्यधन कमी झाले आहे. बुल ट्रोलिंग आणि एलईडी मच्छिमारीमुळे पारंपरिक मासेमारी धोक्यात आली. त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे, पण सरकार त्यांना साध्या सवलतीही देत नाही. या समस्येवरही आमच्याकडे उत्तर आहे.

गोव्यातील शिक्षणाबद्दल लिएंडर म्हणाला, गोव्यात उच्च शिक्षण घेणे परवडणारे नाही. त्यामुळे इच्छा असूनही विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही. आम्ही सत्तेवर आल्यास शिक्षण सवलतीचे करू. विदेशात कित्येक ठिकाणी हा प्रयोग केलेला आहे. शिक्षित विद्यार्थ्यांना रोजगारही मिळण्याची गरज आहे. गोव्यात फक्त 15 लाख लोक आहेत, पण गोव्यातील प्रत्येक चौथा तरुण बेरोजगार आहे. ही स्थिती बदलण्याची गरज आहे. खरे तर गोव्यात हा बदल सहज होण्यासारखा आहे, पण तो करण्याची इच्छाशक्ती सध्याच्या गोव्यातील सरकारात नाही. यासाठीच गोव्यात राजकीय बदल होणे आवश्यक आहे. तो करण्यासाठीच तृणमूल मैदानात उतरली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com