म्हणून राजकारणात आलो, उत्पल पर्रीकरांचं सडेतोड उत्तर

पणजीतील लोकांची साथ मिळाली तर मी परत तो एक मोठा वटवृक्ष होऊ शकतो
Why did Utpal Parrikar enter Goa Politics
Why did Utpal Parrikar enter Goa PoliticsDainik Gomantak

Utpal Parrikar Goa Election: भाजपने गोवा निवडणुकीसाठी आपल्या अनेक उमेदवारांची घोषणा केली आहे, मात्र पणजी मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना पक्षाने तिकीट दिले नाही. त्यानंतर उत्पल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांच्या एका मुलाखतीत उत्पल यांनी भाजपकडून तिकीट न मिळाल्याच्या निर्णयावर उत्तर दिले आहे आणि त्यानंतर ते स्वतः निवडणुकीच्या (Goa Election 2022) रिंगणात उतरले आहेत. (Why did Utpal Parrikar enter Goa Politics)

पर्रीकर कुटुंब भावूक

काल फॉर्म भरण्यासाठी उत्पल पर्रीकर गेले असता माझ्या कुटुंबियांनी देवाकडे साकडे घातले त्यावेळी आमचे पर्रीकर कुटुंब भावूक झाले होते. पक्षाने मला तिकीट न देण्यामागे काहीच कारण नाही त्यांना गेल्या वर्षी पण लोकांचा सपोर्ट होता कार्यकर्त्यांचा त्यांना सपोर्ट होता. आता पक्षाला वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर करता यायला पाहिजे. असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.

निर्णय घेणे खूप कठीण होते

ABPमाझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उत्पल पर्रीकर म्हणाले की, माझ्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. माझ्या वडिलांनी या विधानसभा मतदारसंघात काम केले आणि पक्षाला शून्यातून वर आणले. जवळपास पुर्ण आयुष्य त्यांनी गोव्याच्या विकासासाठी आणि भाजपसाठी दिले पक्ष बांधणीचे काम त्यांनी केले. येथील सर्व कार्यकर्त्यांशी माझे चांगले संबंध आहेत.

Why did Utpal Parrikar enter Goa Politics
गोव्यातील भाजप नेत्यांनी उत्पलला डावलून मोदींचा पराभव केला

उत्पल पर्रीकर राजकारणात का आले?

या मुलाखतीदरम्यान उत्पल यांना तुम्ही राजकारणात यावे असे तुमच्या वडिलांना नको होते, असे विचारले असता यावर उत्पल म्हणाले की, त्यांच्या पणजी मतदारसंघात खूप काही चुकीचे घडत असल्याचे मी पाहिले त्यामुळे कुणाला तरी या विरोधात उभे राहणे गरजेचे होते. मी मनोहर पर्रीकरांचा मुलगा आहे म्हणूनच आज राजकारणात आलो होतो. पक्ष मला संधी देईल, अशी माझी आशा होती. गेल्या वेळी मी निवडणूक लढवू शकलो असतो कारण पक्षाचे सर्व कार्यकर्ते मला तसे करण्यास सांगत होते. पण मी पक्षाच्या पाठीशी उभा राहिलो. तेव्हा मी ते मान्य केले आणि काहीही न बोलता पक्षाला पाठिंबा दिला. मात्र यावेळी मला पुढाकार घेण गरजेचं वाटलं म्हणून मी ही निवडणूक अपक्ष लढविण्याचं ठरवलं.

भाजपने चुकीच्या उमेदवाराला दिले तिकीट

ज्यांनी नेहमीच भाजपच्या विरोधात काम केले अशा उमेदवाराला भाजपने तिकीट दिले आहे. आमचे मतदार त्यांना मतदान करू इच्छित नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांनाही काम करायचे नाही. त्या नेत्यावर बलात्कार आणि इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. मी राजीनामा देताच पक्षाला सांगितले होते की, या जागेवर चांगला उमेदवार पाठवा मी माघार घेईल पण पक्षाने माझ्या निर्णयाचा विचार केला नाही.

Why did Utpal Parrikar enter Goa Politics
फडणवीसांनी तीनवेळा नारळ आपटल्यानंतर पाटणेकर गोवा निवडणुकीच्या रिंगणात

मी तो एक मोठा वटवृक्ष होऊ शकतो

भाजपबरोबर मी सगळ्यात आधी मी काम केले. माझे वडील जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीला पहिल्यांदा उभे राहिले होते तेव्हा मी पक्षासाठी झेरॉक्स फोटो कॉपी करायचे काम केले. मी आधीपासूनच भाजपचा कार्यकर्ता होतो. पण माज्या वडिलांनी मला राजकारणापासून लांब ठेवलं. पण मी माझ्या वडिलांना सातत्याने सपोर्ट केला. जनतेनेही त्यांना आयुष्यभर सपोर्ट केला तेव्हा मलाही पणजीतील जनतेवर विश्वास आहे की, ते माझ्यावर तसच प्रेम करतील माझ्यावर विश्वास ठेवून मला सपोर्ट करतील. मी 101% माझ्या वडिलांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करेन. लोकांची साथ मिळाली तर मी परत तो एक मोठा वटवृक्ष होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com