‘मगो’ पक्ष आगामी गोवा निवडणुकीत बाजी मारू शकेल?

मगोपने (MGP) तृणमुलशी युती केल्यामुळे पक्षाला त्याचा किती फायदा होईल, याबद्दल सर्वसाधारणपणे लोकांकडून विविध तर्क व्यक्त होत आहेत.
‘मगो’ पक्ष आगामी गोवा निवडणुकीत बाजी मारू शकेल?
MGPDainik Gomantak

मगो पक्ष हा तसा सर्वांत जुना स्थानिक पक्ष. 1963 सालापासून म्हणजे पहिल्या विधासनसभेपासून ते आजपर्यंत हा पक्ष विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहे. अठरा वर्षे हा पक्ष सत्तेवर होता. पण हल्लीच्या काही निवडणुकीत या पक्षाचा आलेख आकुंचित होत चालला आहे. 1994 साली बारा आमदार असलेला मगोपक्ष 2002 सालापासून दोन व तीन आमदारांवर घसरला आहे. सुदिन व दीपक ढवळीकर हे बंधू या पक्षाचे महत्त्वाचे शिलेदार. सध्या मगो पक्ष या बंधूच्या कह्यात आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. (Will MGP win in coming Goa Assembly Election 2022)

MGP
Goa Election: प्रसाद गावकर देणार आज आमदारकीचा राजीनामा

सुदिनना (Sudin Dhavalikar) तर पक्षाचे सर्वेसर्वा असे संबोधले जाते. सलग अठरा वर्षे विविध सरकारात मंत्री असलेले सुदिन 2019 सालापासून मात्र मंत्रिपदापासून वंचित आहेत. मडकई हा मगोपचा बालेकिल्ला म्हणून गणला जातो. मडकईत मगोपने दगड ठेवला तरी तो निवडून येईल, असे जे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी वक्तव्य केले होते, ते आजसुध्दा खरे ठरत आहे. 1994 चा अपवाद वगळता मडकईत मगोपचीच ‘सिंहगर्जना’ दिसून आली आहे. 1994 साली भाजपशी युती केल्यामुळे मगो रिंगणात नव्हता, म्हणून मगोचा आमदार त्यावेळी नव्हता. आताही मडकईत बऱ्याच अंशी तीच परिस्थिती असली तरी इतर मतदारसंघात मगोपचे पूर्वीचे वर्चस्व राहिलेले नाही. बरीच वर्षे मगो पक्ष सत्तेत नसल्यामुळे मगोपचे बहुतेक मतदार हे आता भाजपकडे वळल्याचे दिसून येत आहेत. त्‍यामुळे मडकई वगळता इतर मतदारसंघात मगो बाबतीत ‘तळ्यात - मळ्यात’असे वातावरण दिसते आहे.

युतीचा किती फायदा?

मगोपने (MGP) तृणमुलशी युती केल्यामुळे पक्षाला त्याचा किती फायदा होईल, याबद्दल सर्वसाधारणपणे लोकांकडून विविध तर्क व्यक्त होत आहेत. याचा परिणाम म्हणून की काय पेडणेचे संभाव्य उमेदवार प्रवीण आर्लेकर व मयेचे संभाव्य उमेदवार प्रेमेंद शेट यांनी मगोपला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला आहे. युतीमुळे मगोपच्या मतात काही फरक पडेल, असे वाटत नाही.

‘तीन’चा उंबरठा गाठणार?

फोंड्यात (Ponda) डॉ. केतन भाटीकर अथक परिश्रम घेत असले तरी त्याची पोचपावती त्यांना विजयात मिळते की काय? हे बघावे लागेल. फोंड्यातही आता मगोपचे मतदार कमी व्हायला लागले आहेत. प्रियोळमध्ये पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकरांचे भवितव्य विद्यमान मंत्री गोविंद गावडे व उद्योजक संदीप निगळ्ये यांच्या लढतीच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. डिचोलीत माजी आमदार नरेश सावळ हे 2012 सालचा आपल्या करिष्माची पुनरावृत्ती करतात की काय? हे पाहावे लागेल. इतर मतदार संघाबाबत भविष्य वर्तविणे कठीण असले तरी याही वेळी मगो ‘तीन’चा उंबरठा ओलांडेल की काय याची शंकाच वाटते.

MGP
शिवसेना गोवा राज्य सरचिटणीस मिलिंद गावस यांचे निधन

‘मगो’ दहा जागा लढविणार

सध्या मगोपक्ष 10 ते 12 जागा लढविणार असल्याचे कळते. मडकईची शंभर टक्के खात्री देण्यात असली तरी माजी मुख्यमंत्री रवी नाईक हे भाजपतर्फे रिंगणात उतरल्यास ‘चमत्कार’ होऊ शकतो, असा होरा व्यक्त होत आहे. पेडणेत प्रवीण आर्लेकरने मगोपक्ष सोडल्यामुळे ही उमेदवारी राजन कोरगांवकरांना जाणार आहे. पण कोरगावकर गड जिंकतील काय? याबद्दल सांगणे कठीण आहे.

‘मगो’ची भूमिका महत्त्वाची!

सुदिन हे पक्षाचे महत्त्वाचे मोहरे असल्यामुळे ते किती प्रचार करतात, त्यावरही पक्षाचे यशापयश अवलंबून आहे. पण रवींनी जर मडकईत उडी घेतली, तर मात्र सुदिनना मडकईतच ‘स्थानबध्द’ व्हावे लागेल, यात शंकाच नाही. त्याचा परिणाम पक्षाच्या भवितव्यावर होऊ शकतो. पण 2017 सालासाठी ‘त्रिशंकू’ विधानसभा अस्तित्वात आल्यास मात्र मगोपची भूमिका महत्त्वाची ठरू शकेल एवढे निश्चित.

- मिलिंद म्हाडगुत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com