राजकीय स्त्रीशक्ती: नारा 50 टक्के महिला राखीवतेसाठी

आजवर गोमंतकीय राजकारण्यांच्या निवडणुकीतील यशाचा मोठा वाटा त्यांच्या अर्धांगिनींनी उचलला आहे. मग 2022 च्या निवडणूकीत अग्रभागी का राहू नयेत?
Women will be leading in 2022 Goa Assembly elections
Women will be leading in 2022 Goa Assembly elections Dainik Gomantak

उच्च शिक्षणात भारतीय नारीशक्तीचे पाऊल कधीच पुढे पडले आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्‍यासारख्या समाज प्रवर्तकांनी लावलेल्या स्त्रीशिक्षणाच्या रोपट्याचे वृक्षात रुपांतर कधीच झाले आहे. शिक्षणाने माणसाची मानसिकता बदलते या वास्तवाचा विचार केल्यास शिक्षणाचा स्त्रीशक्तीला बराच फायदा झाला आहे.

उच्च शिक्षणामुळे स्त्रीशक्ती सर्व क्षेत्रे काबीज केली आहेत. देशात 49 टक्के महिला मतदार असल्या, तरी देशाच्या विकासात स्त्रियांचा मोठा सहभाग, तरीही संसदेत तिचा 50 टक्क्यांनी प्रवेश झालेला नाही. देशातील 25 टक्के राज्ये स्त्रियांना मुख्यमंत्रीपद देऊ शकलेली नाहीत. एक स्त्री शिकल्यास तिचे कुटुंब, समाज शिक्षित होईल, हा मंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिला. त्यानंतर आलेल्या पंतप्रधानांनी स्त्रीशक्तीच्या प्रगतीसाठी योजना राबवल्या, त्यात महत्त्वाच्या अशा दुरुस्त्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कालावधीत झाल्या. त्यामुळे पंचायत ते नगरपालिका पातळीवर महिलांना 33 टक्के राखीवता मिळाली.

Women will be leading in 2022 Goa Assembly elections
गोव्यातील तीन बायका, फडणवीसांची फजिती ऐका...

प्रारंभी पुरुषांच्या आधाराने पंचायत ते पालिकांचा कारभार रेटणाऱ्या महिला आज बऱ्याच बोलक्या, सक्षमही झाल्या आहेत. कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी त्यांच्या पत्नी डिलायला लोबो यांना 2022 च्या विधानसभा निवडणुकीत उतरवण्याचा ध्यास घेतला असावा. श्री. लोबो यांनी डिलायला यांना निवडणूक रिंगणात पाठवावेच आणि निवडूनही आणावे. डिलायला यांच्यामागे श्री. लोबो ठामपणे उभे राहिल्यास त्या नक्कीच निवडून येतील, यांत शंका नसावी. आजवर गोमंतकीय राजकारण्यांच्या निवडणुकीतील यशात मोठा वाटा त्यांच्या अर्धांगिनींनी उचलला आहे. मग, 2022 च्या निवडणुकीत अर्धांगिनी अग्रभागी का राहू नयेत? गोवा विधानसभा निवडणूक 2022 तून या दशकातील पहिल्या संसद निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत आणि ते नारीशक्तीसाठी 50 टक्के राखीवतेसाठीचे असतील. गोव्यात होणाऱ्या महिला संसदेतून तोच नारा घुमायला हवा, आता 33 टक्के राखीवता नकोच, संसदेत 50 टक्के महिला राखीवता द्या, हेच स्त्रीचे लक्ष्य हवे.

उच्च शिक्षणाने महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे, तिची निर्णयक्षमताही वाढलेली आहे. पण, अन्याय, अत्याचाराविरूद्धचा तिचा लढा संपलेला नाही. शारिरीकदृष्ट्या स्त्री आजही कमकुवत आहे. कारण, तिची शारिरीक जडणघडण, मानसिकदृष्ट्या स्त्रीचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न काल झाले, आजही होत आहेत आणि उद्याही होणारच. अन्याय, अत्याचारांवर मात करीत संसदेकडे पोहोचण्याचा एकच उपाय आहे. पुरुषांच्या हातात हात घालून, त्याच्या खांद्याला खांदा टेकवत, प्रसंगी त्याच्या खांद्याआडून डोकावत तिने आगेकूच केली पाहिजे.

गोव्यात होणारी महिला संसद गोवा विधानसभा 2022 निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. या निवडणुकीत किमान दहा महिलांना प्रत्येक राजकीय पक्षाने रिंगणात उतरण्याची संधी दिली, तर 10-12 महिला गोवा विधानसभेत पोहोचतील, अशी आशा का करू नये?

स्त्रीशक्तीच्या सबळीकरणासाठी बरेच कायदे, योजना झाल्या आहेत, त्यांचा लाभ महिलांनी घेतला आहे. परंतु, 100 टक्के महिलांपर्यंत कायदे, योजनांचा फायदा पोहोचलेला आहे का? या प्रश्नावर भारतीय महिला संसद परिषदेत चर्चा व्हायला हवी. पंडित नेहरूंनी म्हटल्याप्रमाणे स्त्री फक्त शिक्षणातून समाजाला जोडणारी नव्हे, तर विश्वाला एकात्मकतेकडे नेणारी शक्ती आहे, एकात्मकतेतून साध्य काय होईल? शांतीमय जगाची कल्पना साकार होईलच. शिवाय, प्रदुषणाखाली बुडत्या जगाला वाचवण्यासाठी तिचा मंत्रच उपयुक्त ठरू शकतो. तिला पुरुषांनी सहकार्य केल्यास पन्नास नव्हे, अवघ्या पाच वर्षांत गोव्यासारख्या राज्यातून भारतालाही हरितक्रांतीचा मार्ग खुला होऊ शकतो. त्याच मार्गाचे अनुकरण संयुक्त राष्ट्रांना करण्यास भारत का भाग पाडू शकणार नाही?

Women will be leading in 2022 Goa Assembly elections
गोमंतकीय मतदारांनी सतर्क राहावे, व्यक्त व्हावे

सर्वसमावेशकतेतून भारत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरुपी जागेच्या मान्यतेसाठी प्रयत्नशील आहे, पण तत्पूर्वी भारताला सिद्ध करावे लागेल. देश पर्यावरण संवेदनशील बनवणे, कृषी उत्पादन वाढवणे, भूमीवरील ताण कमी करणे, जल संवर्धन करणे, उत्पादनशीलतेतून, निसर्गोपचारातून महामारीवर नियंत्रण ठेवणे, स्वावलंबनाला प्राधान्य देणे हे देशभक्तीइतकेच महत्त्वाचे आहे.

कृषी क्षेत्रात महिला देशातच नव्हे, तर राज्यातही अग्रभागी राहिल्या आहेत. आधुनिकतेतून स्टार्टअपसमध्ये देशाने उंच झेप घेतली, तरी परंपरिक उद्योग, कृषी क्षेत्रानेच देशाला संपन्न केले आहेत. स्त्रीशक्ती या संपन्नेतील महत्त्वाचा घटक आहे. संसदेतील तिच्या विस्तृत सहभागातून देश महासत्ता का होऊ शकणार नाही? त्यासाठी अत्यावश्यकता आहे 50टक्के राखीवतेतून संसदेकडे जाण्याची. गोव्यातून ती मागणी व्हावी, ज्या गोव्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी आरूढ होण्यासाठी मार्ग सुकर केला, त्याच राज्यातून नारीशक्तीच्या उद्धाराची हाक मारल्यास ते ऐकणार नाहीत का? तोच त्यांचा हेतू नसावा ना? फक्त त्याला एकरंग नसावा ना, त्यात वैविध्य हवे, वैविध्यतेतून, एकतेतून कोणतेही कठीण इसिप्त साध्य होऊ शकते, हे विसरू नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com