गोव्याचे आता चौघे जण प्रो फुटबॉल प्रशिक्षक

Dainik Gomantak
मंगळवार, 14 एप्रिल 2020

``मी नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रो डिप्लोमा प्रशिक्षण अभ्यासक्रमास सुरवात केली. त्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंदी आहे. माझ्यासाठी ही मोठी उपलब्धी आहे,`` अशी प्रतिक्रिया क्लिफर्ड यांनी दिली.

पणजी, 

भारताचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्यरक्षक क्लिफर्ड मिरांडा यांनी एएफसी प्रो डिप्लोमा प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहे. क्लिफर्ड यांनी उझबेकिस्तान फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने व्यावसायिक प्रशिक्षणातील पदविका मिळविली. डेरिक परेरामारियान डायससावियो मदेरा यांच्यानंतर क्लिफर्ड हे गोव्याचे चौथे प्रो डिप्लोमाधारक फुटबॉल प्रशिक्षक आहेत. डेरिक परेरा व सावियो मदेरा यांनी भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले आहे.

गोव्याचे ३७ वर्षीय क्लिफर्ड गतमोसमात इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत २०१९-२० मोसमात अखेरच्या टप्प्यात एफसी गोवा संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक होते. क्लब पातळीवर त्यांनी माजी आय-लीग विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबचे तब्बल १५ वर्षे प्रतिनिधित्व केले. भारताकडून ते २००५-२०१४ या कालावधीत ४५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले.

उझबेकिस्तान फुटबॉल असोसिएशनतर्फे घेतलेल्या प्रो डिप्लोमा प्रशिक्षण शिबिरात २१ प्रशिक्षकांनी भाग घेतला होता. त्यात सफल ठरलेले क्लिफर्ड हे एकमेव भारतीय फुटबॉल प्रशिक्षक आहेत. ``मी नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रो डिप्लोमा प्रशिक्षण अभ्यासक्रमास सुरवात केली. त्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंदी आहे. माझ्यासाठी ही मोठी उपलब्धी आहे,`` अशी प्रतिक्रिया क्लिफर्ड यांनी दिली.

संबंधित बातम्या