सिंधुदुर्ग-गोवादरम्यान प्रवासाचे निर्बंध हटविले:  उदय सामंत

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसायानिमित्त येणाऱ्या नागरिकांना केवळ नोंदणी आणि थर्मल तपासणी करणे आवश्‍यक असणार आहे. वाहतुकीसंदर्भातील निर्बंध हटविले आहेत. त्यामुळे गोवा आणि सिंधुदुर्गदरम्यान नोकरीसाठी ये-जा करणाऱ्यांवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत.

ओरोस: सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसायानिमित्त येणाऱ्या नागरिकांना केवळ नोंदणी आणि थर्मल तपासणी करणे आवश्‍यक असणार आहे. वाहतुकीसंदर्भातील निर्बंध हटविले आहेत. त्यामुळे गोवा आणि सिंधुदुर्गदरम्यान नोकरीसाठी ये-जा करणाऱ्यांवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

मंत्रालयात आज झूमच्या माध्यमातून कोकण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी आमदार वैभव नाईक, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्र, पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड आदी उपस्थित होते. 

श्री. सामंत म्हणाले, ‘‘कोरोनाच्या या संकटाशी सामना करताना केंद्र आणि राज्य सरकारतर्फे वारंवार वाहतुकीच्या व प्रवासाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची आणि कामगारांची संख्या लक्षणीय आहे. त्याचा विचार करीत आणि त्यांची कसलीही गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यात प्रवासासाठी घातलेले निर्बंध शिथिल केले आहेत. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व सीमा खुल्या करण्यात आल्या. थर्मल स्कॅनिंग केले जाईल. गोव्यातून कामानिमित्त जिल्ह्यात येणारे व गोव्यात जाणाऱ्यांना परवानगी असेल. आता जिल्ह्याच्या सीमा खुल्या झाल्या आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या