गजराज आले...आणि केळी, सुपारीच्या बागा लुटून गेले

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

तिलारी खोऱ्यातील बांबर्डेत दोन हत्तींचे काल रात्री पुनरागमन झाले. त्यांनी शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान केले. हत्तींचे पुनरागमन झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण आहे.

साटेली भेडशी: तिलारी खोऱ्यातील बांबर्डेत दोन हत्तींचे काल रात्री पुनरागमन झाले. त्यांनी शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान केले. गेले काही महिने हत्तींचा उपद्रव तिलारी खोऱ्यात नसल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता; पण हत्तींचे पुनरागमन झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे.

गोवा अधिवेशन: या सरकारला अधिवेशनात  उघडे पाडू: सरदेसाई -

दोडामार्ग कोल्हापूर मार्गालगत असलेल्या बांबर्डेत हत्तींनी प्रवेश करुन केळीच्या बागा, सुपारीची झाडे, मका व अन्य पिकांचे नुकसान केले. तेथील सत्यवान रामा गवस यांच्या सुमारे 100 केळी, सुपारी आणि मका पिकाचे हत्तींनी नुकसान केले. विठ्ठल गवस, मनोहर गवस, हनुमंत गवस, वासुदेव गवस यांच्या केळी व अन्य पिकांचे नुकसान हत्तींनी केले.

संबंधित बातम्या