‘हमरी-तुमरी’नंतर पुन्हा सॅम आणि पूनम पांडे एकत्र; हे नाटक कशासाठी?

प्रतिनिधी
रविवार, 27 सप्टेंबर 2020

आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे सध्या मात्र तिच्या लग्नामुळे आणि लग्नानंतर झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. या महिन्याच्या ९ तारखेला पूनमचे लग्न झाले आणि हनीमूनसाठी गोव्यात असताना अचानक पती सॅम बॉम्बेशी तिचे जोरदार भांडण झाले.

पणजी: आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे सध्या मात्र तिच्या लग्नामुळे आणि लग्नानंतर झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. या महिन्याच्या ९ तारखेला पूनमचे लग्न झाले आणि हनीमूनसाठी गोव्यात असताना अचानक पती सॅम बॉम्बेशी तिचे जोरदार भांडण झाले. भांडण एवढे वाढले की त्यांना पोलिस ठाण्यापर्यंत जावे लागले. हनीमूनवर असतानाच तीने पतीविरोधात विनयभंग आणि मारहाणीची तक्रार नोंदवली. पूनमच्या पतीला लगेचच पोलिसांनी अटक करून काही तासांत जामीनावर सोडलेही. पूनमने यानंतर पतीबद्दल धक्कादायक खुलासे केले होते. मात्र, आता हा वाद मिटून सारे काही आलबेल झाले असल्याची माहिती पूनमने दिली. 

पूनम याबाबत अधिक बोलताना म्हणाली की, आता आमच्यात सारे काही उत्तम आहे. आम्ही नवीन सुरूवात करण्य़ाच्या तयारीत आहोत. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. एकमेकांच्या प्रेमात आम्ही अक्षरश: वेडे आहोत. लग्नानंतर अशा तक्रारी भांडणं होतातच. वादात कुणी मध्यस्थी केली, यावर उत्तर देताना ती म्हणाली की,  आम्ही आमच्याच स्तरावर वाद निकाली काढला. आम्हाला माहिती आहे की,  वादापेक्षा कुटुंब महत्वाचे आहे. आता आम्ही सोबत आहोत व पूढेही सोबत राहू. 
दरम्यान, सॅमनेही आमच्यात सगळे पुन्हा सुरळीत झाल्याची स्पष्टोक्ती दिली. आम्ही दोघेही आता मुंबईला जाण्यास उत्सुक असून पूनमही आता खूप आनंदी असल्याचे त्याने म्हटले.

पूनमने नेमके काय आरोप केले होते?
मारहाण व विनयभंगाच्या तक्रारीनंतर पूनमने पती सॅम बॉम्बेबद्दल अनेक खुलासे केले होते. तो माझे बोल्ड फोटो व व्हिडीओ विकतो आणि पैसे कमावतो. गेल्या दीड वर्षांत माझ्यासोबत जे घडायला नको ते घडले. मी काय त्रास भोगला ते मलाच माहित. यामुळे माझ्याबद्दल सगळे वाईट लिहितात आणि वाईट बोलतात. मात्र, लग्नानंतर सगळे काही ठीक होईल, असे मला वाटले होते. पण हनीमूनवर असताना त्याने हॉटेलातच मला प्राण्यांसारखे बदडले. तो खूप जास्त आक्रमक असून त्याने मला हॉटेलात अनेकदा मारहाणही केली. त्याने मला मारल्यावरही मी पोलिसात गेले नव्हते. मात्र, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी माझी परिस्थिती बघितल्यावर पोलिसांना बोलविले. माझा चेहरा सुजलेला होता. शरीरावर खुणा होत्या. प्रत्येकवेळी तो मारहाण करतो. मग रडतो, माफी मागतो. आणि मीही प्रत्येकवेळी त्याला माफ करते. मात्र, यावेळी जास्त झाले होते, असे ती म्हणाली होती.    

संबंधित बातम्या