गोवा कर्मचारी निवड आयोग कार्यान्वित   

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

पणजी: सरकारी खात्यात ‘क’ पदाची पदे भरण्यासाठी सरकारने स्थापन करण्यात आलेल्या गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या अध्यक्ष व दोन सदस्यांना मुख्य सचिव परिमल राय यांनी शपथ दिली.त्यामुळे या नोकरभरतीला या आयोगामार्फत लवकरच सुरवात होण्याची शक्यता आहे.

या आयोगाच्या अध्यक्षपदी पुनीत कुमार गोएल (आयएएस), तर सदस्य म्हणून दौलत हवालदार (आयएएस) व मेनिनो डिसोझा (जीसीएस) यांची वर्णी लावण्यात आली आहे.या तिघांनाही आज सरकारतर्फे शपथ देण्यात आली.हा आयोग गेल्यावर्षी १८ सप्टेंबर २०१९ रोजी अस्तित्वात आला होता व तो आता कार्यन्वित झाला आहे. सरकारी खात्यातील ‘क’ पदाच्या जागा भरण्यासाठी या आयोगातर्फे पात्रता चाचणी परीक्षा यापुढे घेण्यात येतील.

संबंधित बातम्या