गोवा राज्‍यातील सर्व कोरोनाचे रूग्‍ण झाले बरे

Dainik Gomantak
रविवार, 19 एप्रिल 2020

या रूग्‍णाला इतर कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांप्रमाणेच आता पुढील १४ दिवस डॉक्‍टरांच्‍या देखरेखीखाली विलगीकरण कक्षात सतर्कता म्‍हणून ठेवण्‍यात येणार आहे.

पणजी,
गोवा राज्‍यात आजपर्यंत सात कोरोनाग्रस्‍त रूग्‍णांची नोंद झाली होती. यातील सहा रुग्‍ण काही दिवसांपासून बरे झाले होते. उरलेला सातवा रूग्‍णही आज कोरोनामुक्‍त झाला असून आता राज्‍यात एकही कोरोनाग्रस्‍त रूग्‍ण नसल्‍याची माहिती आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी दिली. 
या रूग्‍णाला इतर कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांप्रमाणेच आता पुढील १४ दिवस डॉक्‍टरांच्‍या देखरेखीखाली विलगीकरण कक्षात सतर्कता म्‍हणून ठेवण्‍यात येणार आहे. या रूग्‍णांवर इएसआय रूग्‍णायल, मडगाव येथे उपचार करणार्‍या डॉ. एडवीन गोम्‍स आणि त्‍यांच्‍या सहकार्‍यांचे अभिनंदनही मंत्री राणे यांनी केले असून दिवसरात्र झटणार्‍या डॉक्‍टरांच्‍या कष्‍टामुळेच हे शक्‍य झाले असल्‍याचे त्‍यांनी त्‍यांच्‍या ट्‍विटमध्‍ये म्‍हंटले आहे. 

संबंधित बातम्या