‘कोरोना’विरोधात अग्निशमन दलाची अनोखी जनजागृती

Gomantak
शनिवार, 18 एप्रिल 2020

‘कोरोना’विरोधात अग्निशमन दलाची अनोखी जनजागृती 

पणजी,

राज्य अग्निशमन आणि आपत्कालीन दलातर्फे सध्या आग सुरक्षा प्रतिबंधात्मक सप्ताह साजरा करण्यात येत असून, या सप्ताहानिमित्त दलातर्फे ‘कोरोना’ विरोधात जनजागृती करण्यात येत आहे. ‘शमनम्‌ अग्नी, शरणम्‌ अग्नी’ ही यंदाच्या आग सुरक्षा प्रतिबंधात्मक सुरक्षा सप्ताहाची संकल्पना असली, तरी सप्ताहाचे औचित्य साधून राज्य अग्निशमन आणि आपत्कालीन दलातर्फे ‘कोरोना’ विषयी जनजागृती करण्यावर भर देण्यात आला आहे. 
या सप्ताहानिमित्त डिचोली बाजारात आग सुरक्षा एज्युकेशनल व्हॅनद्वारे ध्वनीचित्रफितच्या माध्यमातून ‘कोरोना’ (कोविड-१९) महामारीच्या संसर्गापासून बचाव कसा करावा, त्यापासून कोणती आणि कशी काळजी घ्यावी. सोशल डिस्टंन्सिग कसे पाळावे, त्याविषयी जनतेला उपयुक्‍त माहिती देण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दलातर्फे सर्वत्र सॅनीटायझेशन कसे करण्यात आले. त्याविषयीही व्हीडिओच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे अधिकारी तृप्तेश नाईक यांनी यावेळी या मोहिमेचा संकल्प स्पष्ट केला. 

 

 

संबंधित बातम्या