गोव्याच्या महिला त्रिपुरास भारी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

पणजी: कर्णधार संजुला नाईक हिच्या जबाबदार अर्धशतकाच्या बळावर गोव्याने शनिवारी २३ वर्षांखालील महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत विजय नोंदविला. त्यांनी त्रिपुरास ७६ धावांनी हरवून एलिट क गटात गुणखाते उघडले. सामना चेन्नईतील टी. आय. मुरुगप्पा मैदानावर झाला.

पणजी: कर्णधार संजुला नाईक हिच्या जबाबदार अर्धशतकाच्या बळावर गोव्याने शनिवारी २३ वर्षांखालील महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत विजय नोंदविला. त्यांनी त्रिपुरास ७६ धावांनी हरवून एलिट क गटात गुणखाते उघडले. सामना चेन्नईतील टी. आय. मुरुगप्पा मैदानावर झाला.

गोव्याचा हा स्पर्धेतील पहिला विजय ठरला. काल त्यांना राजस्थानने नमविले होते. गोव्याने आज सकाळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ९ बाद १९६ धावा केल्या. उत्तरादाखल त्रिपुराला ९ बाद १२० धावांचीच मजल मारता आली. बिनबाद ३८ वरून ६ बाद ९८ धावा असा डाव गडगडल्यानंतर त्रिपुरास विजयाची प्रयत्न करणे जमलेच नाही. गोव्याच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करून संघाचा विजय निश्चित केला. गोव्याचा स्पर्धेतील तिसरा सामना मंगळवारी (ता. २८) छत्तीसगडविरुद्ध चेन्नई येथेच खेळला जाईल.

त्यापूर्वी, संजुला नाईक (६२, ७९ चेंडू, ७ चौकार) व तेजस्विनी दुर्गद (३६) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या ७० धावांच्या भागीदारीमुळे गोव्याच्या डावाला बळकटी आली. तेजस्विनीने सलामीवीर पूर्वजा वेर्लेकर (२३) हिच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी करून संघाला सावरले होते. धावफलकावर फक्त दोन धावा असताना श्रेय परब शून्यावर बाद झाल्यामुळे गोव्याचा डाव संकटात सापडला होता. डावाच्या अखेरच्या टप्प्यात शिंदिया नाईक हिने केलल्या २९ धावांच्या खेळीमुळे गोव्याची धावसंख्या वाढण्यास मदत झाली.

संक्षिप्त धावफलक
गोवा : ५० षटकांत ९ बाद १९६ (पूर्वजा वेर्लेकर २३, श्रेया परब ०, तेजस्विनी दुर्गद ३६, संजुला नाईक ६२, दिव्या नाईक ०, शिंदिया नाईक २९, दीक्षा आमोणकर १, पूर्वा भाईडकर ६, सुगंधा घाडी नाबाद ११, दीक्षा गावडे ०, तनया नाईक नाबाद २, सुरवी रॉय ४-३८, सेबिका दास १-२६, एन. एन. देबनाथ १-२९, एम. के. रबीदास १-३७, पूजा दास १-२९) वि. वि. त्रिपुरा : ५० षटकांत ९ बाद १२० (एन. एन. देबनाथ ४५, जे. आर. देबनाथ १४, एस. एच. चक्रबर्ती २४, तनया नाईक ५-१-१०-०, दीक्षा गावडे १०-६-१७-१, शिंदिया नाईक ६-३-११-२, संजुला नाईक ५-०-२६-०, श्रेया परब १०-२-२२-१, तेजस्विनी दुर्गद १०-२-१४-३, पूर्वा भाईडकर ४-०-१९-०).

संबंधित बातम्या