‘मायक्रोसॉफ्ट'ही स्पर्धेत

Dainik Gomantak
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

विद्यापीठाच्या निरीक्षण समितीसमोर १२ कंपन्यांचे सादरीकरण
 

विलास ओहाळ

पणजी,

गोवा विद्यापीठ २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेविषयीचा अभ्यास करणाऱ्या निरीक्षण समितीसमोर आतापर्यंत नामवंत अशा विंडोज प्रणालीची निर्मिती करणारी मायक्रोसॉफ्टसारख्‍या कंपनीनेही आपले सादरीकरण केले आहे. याशिवाय अमेरिकेचीच दुसरी मेरकर टेक्नॉलॉजी ही कंपनीही या स्पर्धेत उतरली आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे प्राथमिकपासून विद्यापीठापर्यंतच्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. विद्यापीठाने ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेता येतील काय, याची पडताळणी सुरू केली आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या डिजीटल लर्निंग विभागाचे प्रमुख प्रा. रामराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली इतर पाचजणांची सहा सदस्यीय समिती तयार केली आहे. ही समिती सध्या ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविण्याबरोबरच, जर परीक्षा हॉलमध्ये परीक्षा घेता आल्या नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्याची विद्यापीठाची तयारी असावी, त्यासाठी संगणक प्रणाली तयार करणाऱ्या विविध कंपन्यांना डेमो सादरीकरणाचे विद्यापीठाने निमंत्रण दिले होते.
विद्यापीठाने दिलेल्या निमंत्रणावरून त्यात सध्या १२ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यात अमेरिकेतील प्रसिद्ध अशी मायक्रोसॉफ्ट आणि मेरकर टेक्नॉलॉजी या कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय मुंबई, बंगळुरू, चेन्नई आणि दिल्लीस्थीत अशा देशातील दहा कंपन्या आपले सादरीकरण करीत आहेत. सोमवारपर्यंत १२ कंपन्यांतील योग्य अशा निवडक कंपन्या निवडल्या जातील आणि त्यांची यादी कुलगुरूंना सादर होईल. त्यानंतर एक कंपनी निवडली जाईल, असे प्रा. वाघ यांनी सांगितले. दुसऱ्या बाजूला ऑनलाईन अभ्यासक्रम गुगल मीटच्या माध्यमातून शिकविण्याचेही पडताळणी सुरू केली आहे. याद्वारे सध्या विद्यापीठाने राज्यातील सर्व महाविद्यालयीन प्राचार्यांची बैठकही घेतली होती.
-----------------------------------
---------------------------------
ऑनलाईन अभ्यासक्रमाची पडताळणी
सध्या विद्यापीठात पीचएडीच्या प्रबंधांचे ऑनलाईनद्वारे सादरीकरणाचे काम सुरू आहे. विद्यापीठ ऑनलाईन सेवांची अनेकबाजूने पडताळणी करीत आहे, त्यात अनेक देशांसह भारतातील काही विद्यापीठांना ऑनलाईन अभ्यासक्रामचे धडे देण्यासाठी काम करणाऱ्या ‘कौरसेरा‘ ही आंतरराष्ट्रीय कंपनीशी विद्यापीठाने संपर्क साधला आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून सहा महिन्यांसाठी गोवा विद्यापीठाला मोफत सेवा देण्यास तयार आहे. जर ही सेवा विद्यापीठाला उत्तम वाटली, तर ती सेवा विद्यापीठ ‘कौरसेरा‘कडून कायमस्वरुपी करण्याचा विचार करू शकते, असेही प्रा. वाघ यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

संबंधित बातम्या