वारखंड शांतादुर्गा बॉईजतर्फे गोवा-महाराष्ट्र कबड्डी स्पर्धा

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पेडणे:वारखंड येथे 25 रोजी गोवा, महाराष्ट्र खुली कबड्डी स्पर्धा

पेडणे:वारखंड येथे 25 रोजी गोवा, महाराष्ट्र खुली कबड्डी स्पर्धा
श्री शांतादुर्गा बॉईजतर्फे, वारखंड-पेडणे येथे शनिवारी २५ रोजी गोवा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने निमंत्रितांची गोवा, महाराष्ट्र खुली कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेचे आयोजन शांतादुर्गा बॉईजतर्फे वैभव केणी व मित्रमंडळी यांनी केले आहे.ही स्पर्धा वारखंड येथील ग्रामपंचायत परिसराजवळ भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या विजेत्या संघाला रोख रुपये वीस हजार व चषक देण्यात येणार आहे.उपविजेत्या संघाला रोख रुपये दहा हजार व चषक देण्यात येणार आहे.तर उपांत्य फेरीतील संघाला तीन हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाईपटू व अष्टपैलू खेळाडूला वैयक्तिक बक्षीस व चषक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्राचे चार संघ व गोव्याचे आठ संघ मिळून बारा संघ सहभागी होणार आहेत.महाराष्ट्रातील संघांपैकी फोंडाघाट, शिव भवानी सावंतवाडी, वालावल व गुढीपुर संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. तर गोव्यातील आठ संघापैकी पणजी स्पोर्ट्‌स सेंटर, आदर्श युवा पेडणे, श्री शांतादुर्गा वारखंड, सिंहगर्जना मूळगाव, मल्लिनाथ म्हापसा, आर. सी.सी. पाडी, मडकई रायडर्स व दुर्गादेवी वास्को या संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा शनिवारी दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होईल.तरी सर्व निमंत्रित संघांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गोवा कबड्डी संघटनेच्या अध्यक्ष रुक्‍मिणी कामत, आधार स्तंभ दत्ताराम (बांबू) कामत तसेच सर्व पदाधिकाऱ्यानी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

कुडचडे ‘युवा स्वराज’ला आयएसओ प्रमाणपत्र

संबंधित बातम्या