जिल्हा पंचायत निवडणूक आणि भाजपचे उमेदवार

Goa Zp election candidates list
Goa Zp election candidates list

पणजी : आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे.

या परिषदेवेळी त्यांच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर, दामोदर नाईक व कुंदा चोडणकर हे उपस्थित होते. यावेळी अधिक माहिती देताना तानावडे म्हणाले की, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या २५ मतदारसंघापैकी १४ तर दक्षिणेतील २५ पैकी ४ मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. उत्तरेतील हरमल - अनंत मधुकर गडेकर (सर्वसाधारण), मोरजी - धनंजय महादेव शेटगावकर (सर्वसाधरण), धारगळ - मनोहर यशवंत धारगळकर (अनुसूचित जाती, सर्वसाधारण), तोरसे - सीमा रामा खडपे (महिला, सर्वसाधारण), शिवोली - सानिशा सतिश तोरस्कर (महिला, सर्वसाधारण), हळदोणे - मनिषा महेश नाईक (इतर मागासवर्गीय, महिला),

हणजुणे - निहारिका नारायण मांद्रेकर (महिला, सर्वसाधारण), कळंगुट, दत्तप्रसाद मुरारी दाभोळकर (सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय), कारापूर - सर्वण - महेश अनंत सावंत (इतर मागासवर्गीय, सर्वसाधारण), मये - शंकर अनंत चोडणकर (सर्वसाधारण), पाळे - गोपाळ महादेव सुर्लकर (अनुसूचित जमाती, सर्वसाधारण), होंडा - सगुण सिताराम वाडकर (सर्वसाधारण), केरी - देवयानी देविदास गावस (सर्वसाधारण, महिला) व नगरगाव - राजेश्री शानू काळे (अनुसूचित जमाती, महिला) यांचा तर दक्षिणेतील उसगाव - गांजे - उमाकांत महादेव गावडे (अनुसूचित जमाती, सर्वसाधारण), दवर्ली - उल्हास यशवंत तुयेकर (सर्वसाधारण), बार्से - खुशाली जोरगो वेळीप (सर्वसाधारण) व खोला - शानू शाकलू वेळीप (सर्वसाधारण) यांचा समावेश आहे.

उर्वरित उमेदवरांची घोषणा दोन दिवसांत : तानावडे

जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपच्‍या स्थानिक कार्यकर्त्यांना तसेच गट मंडळाशी चर्चा करून मतदारसंघातील एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निवडणुकीत उत्तर व दक्षिण जिल्हा पंचायतमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मतदारसंघासाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झाली होती. स्थानिक पातळीवरील चर्चेनंतर भाजप राज्य निवडणूक समितीची बैठक होऊन १८ उमेदवार निश्‍चित करण्यात आले. उर्वरित उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या दोन दिवसांत ती पूर्ण केली जाईल, असे भाजप प्रदेशाध्‍यक्ष सदानंद तानावडे म्हणाले.

काँग्रेसने अगोदर पक्षपातळीवर निवडणूक न लढविण्याचा व त्यानंतर पक्षपातळीवर लढविण्याचा निर्णय घेतल्याने ती द्विधा स्थितीत व गोंधळलेले आहेत. ही निवडणूक विधानसभेची ‘सेमिफायनल’ नसल्याचे स्पष्ट करून तानावडे म्हणाले की, प्रत्येक निवडणूक ही त्यावेळच्या परिस्थितीच्या मुद्यावर लढविली जाते. विरोधक नेहमीच आरक्षणसंदर्भात सत्तेवर असलेल्या सरकारवर आरोप करत असतात त्यात नवल नाही. आरक्षणाची माहिती भाजप अगोदरच मिळाली होती असे आरोप काँग्रेसने केले आहेत, त्यात तथ्य नाही. त्यांच्याकडे भाजपला टक्कर देणारे उमेदवारच नसल्याने ते असे आरोप करत आहेत.

मागील निवडणुकीत मगो पक्षाबरोबर भाजपची युती होती त्यामुळे त्याचा फरक निवडणूक निकालावर पडणार काय असे विचारले असता ते म्हणाले, जे आमच्याबरोबर असतात त्यांना पक्ष नेहमची बरोबर घेऊन पुढे जात असतो. यावेळी भाजप स्वबळावर ही निवडणूक लढवत आहे तर काही मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देईल असे त्यांनी सांगितले. आरक्षण हे नियमानुसारच झाले असून कोणावरही अन्याय झालेला नाही. ज्या ठिकाणी आरक्षण झाले व तेथे निवडणूक लढविण्यास उमेदवार इच्छुक होते त्यांना ही आरक्षण ‘रोटेशन’ पद्धतीमुळे अन्याय झाल्याचे आरोप करणार हे अपेक्षित आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com