संबंधित बातम्या
खांडोळा येथील श्री. शांतादुर्गा देवीचा वार्षिक कालोत्सव सोमवार दिनांक ११ व...


विद्या राणे...


यावर्षी जन्माष्टमी उत्सवानिमित्त राज्यात दहीहंडीवर बंदी घालण्यात आली आहे. घरगुती तसेच सार्वजनिक
गणेश उत्सवावर तसेच कंटेन्मेंट झोनसाठी काही अटींची सक्ती केली आहे.
पणजी
कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात गणेशचतुर्थी व जन्माष्टमी उत्सवासंदर्भात सरकारने मार्गदर्शक
सूचना जारी केल्या आहेत. यावर्षी जन्माष्टमी उत्सवानिमित्त राज्यात दहीहंडीवर बंदी घालण्यात आली आहे. घरगुती तसेच सार्वजनिक
गणेश उत्सवावर तसेच कंटेन्मेंट झोनसाठी काही अटींची सक्ती केली आहे. सार्वजनिक गणेशमूर्ती चार फूट उंच तसेच मूर्ती स्थापना व विसर्जनावेळी ६ व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.
गोव्याबाहेरून येणाऱ्यांसाठी
गोव्याबाहेर गणेशमूर्ती आणण्यासाठी जाणारे २४ तासांमध्ये परतल्यास क्वारंटाईन किंवा कोविड चाचणीची सक्ती नाही. मात्र, त्यांना हद्दीवर त्याची नोंद करणे आवश्यक आहे. गोव्याबाहेरून येणाऱ्यांना ज्या मार्गदर्शक सूचना लागू आहेत त्याची कार्यवाही सक्तीची आहे. त्यांनी आयसीएमआर अधिकृत लॅबचे कोविड निगेटिव्ह चाचणी अहवाल येताना आणावा किंवा गोव्यात आल्यावर त्यांनी कोविड चाचणी करून अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन व्हावे किंवा चाचणी न केल्यास १४ दिवस होम क्वारंटाईन होणे सक्तीचे आहे. जे गणेशचतुर्थीसाठी गोव्याबाहेर जात आहेत त्यांना बाहेर जाण्यासाठीच्या परवान्याची गरज नाही. मात्र, परतताना अस्तित्त्वात असलेल्या सूचना पाळाव्या लागणार आहेत.
क्वारंटाईन, होम आयझोलेशन
व्यक्तींवर निर्बंध
चित्रशाळेच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी चित्रशाळाधारकांनी गणेशमूर्ती घरी पोचविण्याची शक्यतो सोय करावी. ज्येष्ठ नागरिक व मुलांना चित्रशाळेच्या ठिकाणी घेऊन येऊ नये. शक्य असल्यास २० ऑगस्टपासूनच गणेशमूर्तींची विक्रीला सुरवात केली जावी. सार्वजनिक गणेशोत्सवांना काही अटींवर परवानगी दिली जाईल. मनोरंजनात्मक कार्यक्रम व देखाव्यांना प्रतिबंध करण्यात आले आहे.
सार्वजनिक गणेशमूर्तींचे दर्शन थेट प्रक्षेपण करून घरीच लोकांना देण्याचा प्रयत्न समितीने करावा. तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे वाटप करता येणार नाही. आरतीसाठी जास्तीत जास्त १० पेक्षा अधिकजण नसावेत. घरगुती गणेशोत्सवावेळी कोणाच्या घरी भेट देणे टाळावे.
होम क्वारंटाईन व होम आयझोलेशन असलेल्यांनी कोणाला घरी बोलावू नये व स्वतःही दुसऱ्यांकडे जाऊ नये. पुरोहिताने सामाजिक अंतर ठेवून घरगुती गणेशमूर्तीची पूजा करावी.
विसर्जनावेळी पाचपेक्षा
अधिक व्यक्ती नसाव्यात
गणेश विसर्जनावेळी त्याचे प्रभागवार वेळापत्रक तयार करावे व प्रत्येक प्रभागाला द्यावे. नेमून दिलेल्या वेळेनुसार विसर्जन पोलिसांच्या देखरेखीखाली केले जावे. हे विसर्जन संध्याकाळी ५ ते रात्री १० पर्यंत या वेळेतच करता येईल. विसर्जनावेळी कोणतेच कार्यक्रम करता येणार नाही. वाहनातील गणेशमूर्तीसोबत पाचपेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत.
कंटेन्मेंट झोनमधील लोकांची
जबाबदारी पंच, नगरसेवकांवर
कंटेन्मेंट किंवा सील केलेल्या झोनमध्ये घरात वैयक्तिक गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी आहे. मात्र, सार्वजनिक गणेशोत्सव त्या
झोनमध्ये आयोजित करता येणार नाही. गणेशमूर्ती आणण्यासाठी त्या भागातील पंच किंवा नगरसेवकांकडे संपर्क साधल्यास त्यांना ही गणेशमूर्ती त्यांच्या घराच्या दरवाजापर्यंत आणून दिली जाईल. या झोनमधील लोकांना शेजाऱ्यांशी संपर्क किंवा त्यांच्याकडे जाऊ नये.
गणेशमूर्ती विसर्जनावेळी या झोनमधील प्रत्येक कुटुंबातील दोन व्यक्तींना परवानगी असेल. हे विसर्जन जवळच असलेल्या ठिकाणी ठरवून दिलेल्या वेळेतच करावे लागेल. विसर्जन झाल्यानंतर या व्यक्तींनी इतर कोणाशीही चर्चा न करता घरी परतावे. गणेश विसर्जन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वाहनांची सोय केली जाईल. या झोनमध्ये पुरोहिताला पूजा करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.
जन्माष्टमीस परवानगी,
दहीहंडीवर बंदी
जन्माष्टमी उत्सवावेळी लोकांना शेजाऱ्यांकडे जाण्याचे टाळावे तसेच सामाजिक व धार्मिकतेसाठी जमा होता येणार नाही. कंटेन्मेंट झोन किंवा सील केलेल्या भागातील लोकांनी त्यांच्या भागातील पंच किंवा नगरसेवकाकडे उत्सव साहित्यासाठी संपर्क साधावा. या साहित्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागतील. होम क्वारंटाईन किंवा होम आयझोलेशन असलेल्या लोकांना हा उत्सव साजरा करता येणार नाही. साहित्य खरेदी दुकानात सामाजिक अंतर ठेवून करावी. या उत्सवाच्या शुभेच्छा प्रत्यक्षात घरी जाऊन भेट न देता सोशल मीडिया किंवा फोनवरून द्याव्यात, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
कंटेन्मेंट झोनमध्ये
सार्वजनिक गणेशोत्सवास बंदी
विसर्जन नियोजित वेळेतच करावे
घरगुती विसर्जनासाठी प्रशासनाकडून वाहनसुविधा
पुरोहिताला पूजा करण्यास प्रतिबंध
उत्सवासाठी मार्गदर्शक सूचना
प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा
सार्वजनिक गणेशमूर्ती चार फुटापेक्षा कमी उंच असावी
मूर्ती स्थापना, विसर्जनासाठी ६ व्यक्तींना परवानगी
पुरोहिताला पूजा करण्यास परवानगी
साहित्य खरेदीसाठी दुकानात सामाजिक अंतर ठेवावे
goa goa goa