वीज बिलांत वाढ नाही

Dainik Gomantak
सोमवार, 1 जून 2020

वीज दरवाढ सध्या होणार नसल्याने वीज ग्राहकांना सध्या दिलासा मिळाला आहे.

पणजी

संयुक्त विद्युत नियामक आयोगाने (जेईआरसी) प्रस्तावित केल्यानुसार जूनपासून विजेच्या बिलामध्ये वाढ केला जाणार नाही, अशी माहिती वीजमंत्री निलेश काब्राल यांनी दिली. ही वीज दरवाढ सध्या होणार नसल्याने वीज ग्राहकांना सध्या दिलासा मिळाला आहे.
कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अर्थव्यवस्था तसेच अनेक व्यवसायिक व लोक अडचणीत आहेत. त्यामुळे ही वीज दरवाढ करून लोकांना त्याचा त्रास देऊ नये असे मत मुखमंत्र्यांकडे मांडले होते व ही वीज दरवाढ वाढवू नये अशी विनंती केली होती. ही वीज दरवाढ न वाढवता वीज खात्याला सरकारने अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी अशी बाजू मांडला होती. वीज खात्याला अर्थसंकल्पात ज्या निधीची तरतूद करण्यात आली आहे त्यापेक्षा आणखी ३०० कोटींची आवश्‍यकता आहे. सध्या अनेकांनी वीज बिले जमा न केली नाहीत त्यामुळे त्यांची थकबाकी मोठ्या प्रमाणात राहिली आहे. त्यामुळे थकबाकी जमा करण्यासाठी खात्याने अनेकदा प्रयत्न केले होते मात्र अजूनही काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. अजूनही ज्या वीज ग्राहकांनी त्यांची थकबाकीसह मोठी रक्कम असलेली बिले जमा केली नाहीत त्यांना ही रक्कम जमा करण्यासाठी काही सूट देण्यासंदर्भात खात्याने विचार सुरू केला आहे असे वीजमंत्री काब्राल यांनी सांगितले.

संबंधित बातम्या