देशप्रभू मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी होणार

dainik gomantak
रविवार, 10 मे 2020

दिवंगत देशप्रभू यांच्‍या सिटी स्‍कॅनबाबतीत झालेल्‍या विलंबाप्रति गोमेकॉतील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्‍यात आले असून तिघांची समिती या प्रकरणातील धागेदोरे बाहेर काढण्‍यासाठी नेमण्‍यात आली आहे.

पणजी, 

पेडण्‍याचा राजा म्‍हणून नावलौकिक असणारे काँग्रेसचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांच्‍या आरोग्‍याबाबत गोवा वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्‍या हलगर्जीपणाचा लोक वेगवेगळ्या माध्‍यमातून विरोध करीत आहे. दरम्‍यान आरोग्‍यमंत्री विश्वजित राणे यांनी कडक भूमिका स्वीकारलेली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्‍यात येणार असून ज्‍याची चूक असेल त्‍याला त्‍या चुकीची शिक्षा मिळणार असल्‍याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांच्‍यासह अनेक नेत्‍यांनी या प्रकरणाबाबत कोणत्‍याही प्रकारची टिप्पणी केलेली नाही. मात्र सोशलमिडीआवर लोकांनी खुलेआमपणे प्रशासनाला प्रश्‍‍न विचारण्‍यात सुरुवात केली आहे. दिवंगत देशप्रभू यांच्‍या सिटी स्‍कॅनबाबतीत झालेल्‍या विलंबाप्रति गोमेकॉतील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्‍यात आले असून तिघांची समिती या प्रकरणातील धागेदोरे बाहेर काढण्‍यासाठी नेमण्‍यात आली आहे.
गोमेकॉसारख्‍या इस्‍पितळात माजी आमदारांसारख्‍या मोठ्या व्‍यक्‍तीच्‍या आरोग्‍याची हेळसांड होत असेल तर सर्वसामान्‍यांचे कसे हाल होत असतील, असा प्रश्‍‍न सर्वसामान्‍य जनता विविध माध्‍यमातून विचारत आहे.

 

संबंधित बातम्या