भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात ‘सार्थक’ गस्तीनौका 

बाबुराव रेवणकर
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या ‘सार्थक’ या गस्तीनौकेचे डिजीटल माध्यमांद्वारे आज (गुरुवारी) एका छोटेखानी कार्यक्रमात जलावतरण केले. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत हा सोहळा पार पडला. 

मुरगाव
गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या ‘सार्थक’ या गस्तीनौकेचे डिजीटल माध्यमांद्वारे आज (गुरुवारी) एका छोटेखानी कार्यक्रमात जलावतरण केले. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत हा सोहळा पार पडला. 
‘कोरोना’मुळे सर्वत्र व्यावसायिक संकट आलेले असतानाही सार्वजनिक क्षेत्रातील देशातील आघाडीची जहाज बांधणी कंपनी असलेल्या गोवा शिपयार्डने आपली कार्यकुशलता दाखवून भारतीय तटरक्षक दलासाठी चौथे अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञान असलेले जहाज बांधून त्याचे जलावतरण केले. 
देशाचे संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पत्नी सौ. वीणा कुमार यांच्या हस्ते डिजीटल माध्यमातून जलावतरण करण्यात आले. यावेळी संरक्षण खात्यातील राज कुमार, सौ. गार्गी कौर, भारतीय तटरक्षक दलाचे सरसंचालक के. नटराजन, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बी. बी. नागपाल व इतर अधिकारी उपस्थित होते. 
संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार सांगितले, देशाच्या सागरी पट्ट्यातील अतिरेकी कारवायांचा धोका ओळखून तटरक्षक दलाने आतापर्यंत आपल्या गस्ती नौकाद्वारे बजावलेली कर्तबगारी उल्लेखनीय आहे. त्यांच्या सेवेत आणखी एक गस्ती नौकेची भर पडल्याबद्दल डॉ. कुमार यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी तटरक्षक दलाचे सरसंचालक के. नटराजन आणि गोवा शिपयार्डचे बी. बी. नागपाल यांचीही समयोचित भाषणे झाली.

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या