‘योगामध्ये आत्मशोध करण्याची शक्ती’

dainik Gomantak
रविवार, 21 जून 2020

योगामध्ये तंदुरुस्त शरीर, मन व आत्मा शुद्ध राखण्याची ताकद आहे. शिवाय योगामध्ये आत्मशोध करण्याची शक्ती असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी उद्याच्या विश्र्व योगदिनाच्या पूर्वसंध्येला संदेश देताना म्हटले.

फातोर्डा

उद्या विश्र्व योग दिनानिमित्त देशात ‘कोविड १९’ संसर्गामुळे जाहीर कार्यक्रम आयोजित करणे शक्य झालेले नसले तरी आयुष मंत्रालयातर्फे मुख्य कार्यक्रम सकाळी ७ वाजता होईल व सर्वांनी आपल्या घरात बसून कुटुंबियांसोबत योग साधना करावी, असे आवाहन केले आहे.
केंद्रीय आयुष मंत्रालयाने ‘माय गव्हर्नमेंट’च्या सहकार्याने व्हिडिओ ब्लॉगींग योग स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी १.७५ लाख रुपयांची बक्षिसेही प्रायोजित केली आहेत.
स्पर्धकाने योग प्रात्यक्षिकांचा तीन मिनिटांचा व्हिडिओ मंत्रालयाला पाठवायचा आहे. त्यासाठी मंत्रालयाने दिलेली लिंक किंवा ‘माय गव्हर्नमेंट’च्या पोर्टलचा वापर करावा, असे मंत्रालयाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. या स्पर्धेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मान्यता लाभली असून त्यांच्या पुढाकारानेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या