‘आयर्न लेडी’मुळे देश प्रगतीपथावर!

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

‘आयर्न लेडी’ म्हणून नाव मिळवलेल्या देशाच्या दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी धोरणात्मक आणि खंबीर निर्णय घेतले. त्यामुळेच आज देश प्रगतीपथावर पोचू शकला. आयर्न लेडीप्रमाणेच पोलादी पुरुष म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते सरदार वल्लभभाई पटेल यांनीही देशाच्या एकतेकडे लक्ष दिले. देश दुभंगू नये म्हणून धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले, त्यामुळेच आज आपण एकसंध देशाचे नागरिक राहू शकलो, असे उद्‌गार फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी काढले.

फोंडा :  ‘आयर्न लेडी’ म्हणून नाव मिळवलेल्या देशाच्या दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी धोरणात्मक आणि खंबीर निर्णय घेतले. त्यामुळेच आज देश प्रगतीपथावर पोचू शकला. आयर्न लेडीप्रमाणेच पोलादी पुरुष म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते सरदार वल्लभभाई पटेल यांनीही देशाच्या एकतेकडे लक्ष दिले. देश दुभंगू नये म्हणून धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले, त्यामुळेच आज आपण एकसंध देशाचे नागरिक राहू शकलो, असे उद्‌गार फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी काढले.

खडपाबांध - फोंडा येथे गट कॉंग्रेसतर्फे श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व वल्लभभाई पटेल यांची जयंती आज (शनिवारी) साजरी करण्यात आली. यावेळी फोंड्याचे आमदार तथा कॉंग्रेसचे नेते रवी नाईक तसेच कॉंग्रेस पक्षाचे फोंड्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते. आमदार रवी नाईक तसेच इतरांच्या हस्ते श्रीमती इंदिरा गांधी तसेच वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी दोन्ही नेत्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. 

आमदार रवी नाईक म्हणाले की, श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशहिताला प्राधान्य दिले. देशाचे हीत त्यांनी जपले आणि देशासाठीच प्राण दिले. अशा आयर्न लेडीमुळे आज देश प्रगतीपथावर पोचला. आजच्या युवा पिढीने देश हिताला प्राधान्य देताना थोर पुरुषांचे आदर्श जपावेत, असे आवाहनही त्यांनी केले.  यावेळी फोंडा गट कॉंग्रेसचे अध्यक्ष अरुण गुडेकर, आंचल गावस, शब्बीर शेख तसेच इतरांनी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन किशोर नाईक यांनी केले तर गीता सिरसाट यांनी आभार मानले. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.

संबंधित बातम्या