आम आदमी पक्षातर्फे ‘ऑक्सिमीटर’ मोहीम

प्रतिनिधी
रविवार, 6 सप्टेंबर 2020

कुडतरी येथील आम आदमी पक्षाच्या स्वयंसेवकांनी मनोरा राय येथील रहिवासीयांसाठी बुधवारी २ सप्टेंबर रोजी ‘ऑक्सिमिटर’ मोहीम राबवली. यावेळी राय पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.

फातोर्डा: कुडतरी येथील आम आदमी पक्षाच्या स्वयंसेवकांनी मनोरा राय येथील रहिवासीयांसाठी बुधवारी २ सप्टेंबर रोजी ‘ऑक्सिमिटर’ मोहीम राबवली. यावेळी राय पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.

या मोफत मोहीमेद्वारे लोकांच्या प्राणवायू (ऑक्सिजन) संपृक्ततेचा दर्जाची तपासणी करण्यात आली. तसेच नाडी दर, तापमान तपासण्यात

 आले. तपासणीत आढळून आलेल्या निकषाचा अहवाल प्रत्येकाला देण्यात आला.

ऑक्सिमीटर मोहीम ही आम आदमी पार्टीची राष्ट्रीय स्तरावरील मोहीम आहे. यात पार्टीचे स्वयंसेवक भाग घेतात. मनोरा येथील ही मोहीम स्थानिक पंच सदस्य इनासिना क्वाद्रोस यांच्या घरी करण्यात आली. यावेळी आपचे जिल्हा परिषद उमेदवार ब्रिंडा डिसिल्वा (कुडतरी) व लिआ गोम्स(राय) यांनी उपस्थित राहून मोहिमेला सहकार्य केले. ही मोहीम यापुढेही सुरू राहील. ज्यांची तपासणी करून घ्यायची इच्छा असेल त्यांनी सिडनी बाराको (९८५०४६९२९३) यांच्याशी संपर्क साधावा. आपचे स्वयंसेवक जुझे आंतोनियो फर्नांडिस यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या