‘संगथ’च्या अभ्यासात कोरोनाव्हायरसमुळे कौटुंबिक आरोग्याबद्दल चिंतेत वाढ

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

कोरोनापश्चातही अभ्‍यास संशोधनातून असे लक्षात आले की, ९८ टक्के लोक कोविडपासून मुक्त झालेले आहेत. ३८ टक्के लोकांना आपल्या कुटुंबियांना किंवा आप्तेष्टांना कोविडचा संसर्ग होणार नाही ना? याची काळजी वाटत आहे.

पणजी: देशासह राज्यातही कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढतेच आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याबाबत समाजात असणारी भीती तणावात रुपांतरित होत आहे. आपल्याला किंवा आपल्या घरातील लोकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून लोक समस्‍याग्रस्‍त झाले आहेत, असे निरीक्षण जूनमध्ये ‘संगथ’ या संस्थेने केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. गोव्यासह इतर राज्यात चिंतेचे रूपांतर आता गहन स्वरूपाच्या तणावात होत असल्याचे मानसोपचार तज्‍ज्ञांचे म्हणणे आहे. 

कोरोनापश्चातही अभ्‍यास संशोधनातून असे लक्षात आले की, ९८ टक्के लोक कोविडपासून मुक्त झालेले आहेत. ३८ टक्के लोकांना आपल्या कुटुंबियांना किंवा आप्तेष्टांना कोविडचा संसर्ग होणार नाही ना? याची काळजी वाटत आहे. २३ टक्के लोकांना आपल्यामुळे इतरांना कोरोना होणार नाही ना? याची भीती वाटत आहे. तर ९ टक्के लोकांना कोविडमुळे आपल्याला मृत्यू येणार नाही ना? याची भीती वाटत असल्‍याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. हा अभ्यास कोरोनापश्चातही केला जाणार असल्याची माहिती ‘संगथ’ या संस्थेने दिली.

६७३ लोकांशी संपर्क
जून ११ ते जुलै १० या कालावधीत ‘संगथ’ संस्थेच्या संशोधन करणाऱ्या टीमने गोवा, कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रातील मिळून ६७३ लोकांशी संपर्क साधला. यात गोवा आणि दिल्ली येथील १८ ते ४० वयोगटातील लोकांची माहिती एकत्रित करण्यात आली. या संशोधनातून जे सत्य समोर आले त्यानुसार सुमारे ८३ टक्के लोक हे कमी अधिक प्रमाणात कोरोनामुळे तणावात आहेत, तर ३० टक्के लोकांमध्‍ये तणावाची लक्षणेही दिसू लागली आहेत. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या