गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी ‘गोमेकॉ’त ‘स्मार्ट’ उपाय

dainik gomantak
गुरुवार, 7 मे 2020

गोमेकॉत उपचारासाठी यावयाचे आहे त्‍यांनी ०८३२-२४९५३३१ किंवा ०८३२-२४९५३०१ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. त्‍यानंतर रूग्‍णाला कोणता त्रास आहे, यावरून त्‍यांना योग्‍य ती वेळ देण्‍यात येणार आहे.

पणजी, 

गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्‍पितळासह राज्‍यातील इतर सरकारी आरोग्‍य केंद्रांच्‍या ओपीडी आता रूग्‍णांच्‍या सेवेसाठी खुल्‍या झाल्‍या आहेत. गोमेकॉ हे राज्‍यातील महत्त्‍वाचे इस्‍पितळ असल्‍याने येथे रुग्‍णांची गर्दी होण्‍याची शक्ता असल्‍याने आरोग्य खात्याने गोमेकॉत ‘स्‍मार्ट’ उपाय आखले आहेत.
यातील महत्त्‍वाचा उपाय म्‍हणजे फोन क्रमांकावरून आता रुग्‍णाला तपासणीसाठी वेळ घेता येणार आहे. तसेच ज्‍यांना ताप आहे त्‍यांनी सक्‍तीने मास्‍कचा वापर करीत ओपीडी क्रमांक ३० मध्‍ये जाण्‍यासाठीची सूचना गोमेकॉ प्रशासनाने केली आहे.
गोमेकॉत येताना मास्‍क घालून येणे सक्‍तीचे करण्‍यात आले आहे. तसेच येथे जागोजागी सॅनिटायझर मशिनची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. लोकांना विनाकारण गर्दी करण्‍याचा प्रयत्‍न करू नये, असे आवाहनही येथे येणाऱ्या रूग्‍णांना करण्‍यात आले आहे. गोमेकॉसह राज्‍यातील इतर आरोग्‍य केंद्रांच्‍या बाबतही अशाप्रकारची फोनच्‍या माध्‍यमातून डॉक्‍टरची वेळ घेण्‍यासाठीची उपाययोजना करण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू असल्‍याची माहिती आरोग्‍य खात्‍याने दिली.

उपचारासाठी साधा
दूरध्वनीवर संपर्क
गोमेकॉत उपचारासाठी यावयाचे आहे त्‍यांनी ०८३२-२४९५३३१ किंवा ०८३२-२४९५३०१ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. त्‍यानंतर रूग्‍णाला कोणता त्रास आहे, यावरून त्‍यांना योग्‍य ती वेळ देण्‍यात येणार आहे. फोनवरून वेळ मिळविण्‍यासाठीचा उपक्रम सुरू करण्‍याचा जुना प्रयत्‍न असून, या प्रयत्‍नाला आता यशस्‍वी स्‍वरूप देण्‍यासाठी गोमेकॉ प्रशासन काम करीत आहे.

संबंधित बातम्या