मडगावात 1 लाख 46 हजारांचे अंमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी मडगाव येथील सुलभ शौचालय परिसरात येत होते.
मडगावात 1 लाख 46 हजारांचे अंमली पदार्थ जप्त
1 lakh 46 thousand medicines seized in Margao Dainik Gomantak

सासष्टी: मडगाव येथील अग्निशामक दलाजवळील सुलभ शौचालय परिसरात अंमली पदार्थ बागळल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी कारवाईत संशयित मेहबूब परकिवाले (वय 32, मडगाव) याला अटक करून त्याच्याकडून 1 लाख 46 हजार रुपयांचा 1 किलो 461 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केला.

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्ती गुरुवारी दुपारच्या वेळी अंमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी मडगाव येथील सुलभ शौचालय परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्वरित कारवाई करून संशयिताला अटक केली. संशयिताला अटक करून अमलीपदार्थ विरोधी कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

1 lakh 46 thousand medicines seized in Margao
कुजलेल्या अवस्थेत वाघुर्मेत आढळला युवतीचा मृतदेह!

पोलिसांनी या कारवाईत संशयिताकडून सुमारे 1 लाख 46 हजार 100 रुपयांचा दीड किलो अंमली पदार्थ जप्त केला. ही कारवाई मडगाव पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वर्षदा नाईक करीत आहेत.

वीस दिवसांत दुसरी कारवाई

मडगाव पोलिसांनी अंमली पदार्थ प्रकरणात गेल्या वीस दिवसांत केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी हरिओम राठोड याला अटक करून त्याच्याकडून 2 लाख रुपयांचा 2 किलो गांजा जप्त केला होता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com