‘भवाल’ नाटकास १ लाखांचे पारितोषिक; १३ व्या 'अ' गट मराठी नाटयस्पर्धेचा निकाल जाहीर

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

कला अकादमीने आयोजित केलेल्या १३ व्या 'अ' गट मराठी नाटयस्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

पणजी ःकला अकादमीने आयोजित केलेल्या १३ व्या 'अ' गट मराठी नाटयस्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विमलानंद कलामंच. लाडेवाडा, करंझाळे-मडकई यानी सादर केलेल्या भवाल या नाटकास एक लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. अपरांतमाची, पणजी यांच्या लग्न फेरे या नाट्यप्रयोगास पंचाहत्तर हजार रुपयांचे व्दितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तसेच रसरंग, उगवे यांच्या अन्धा युग या नाटकाची पनास हजार रुपयांसाठीच्या तृतीय पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक श्री. केतन जाधव याना 'भवाल' या नाटकासाठी प्राप्त झाले असून श्री. ज्ञानेश मोघे याना 'लग्न फेरे' नाटकासाठी द्धितीय पारितोषिक प्राप्त झाले तर तृतीय पारितोषिक 'अन्धा युग' नाटकासाठी श्री. निलेश महाले याना देण्यात आले.

पुरुष गटात वैयक्तिक अभिनयासाठी सलील नाईक याना 'लग्न फेरे' नाटकातील निहारच्या भुमिकेसाठी प्रथम पारितोषिक देण्यात आले असून व्दितीय पारितोषिक श्रवण फोडेकर याना 'भवाल' नाटकातील फकीर-३ या भुमिकेसाठी प्राप्त झाले. अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रे संतोष नाईक (सत्येन बॅनर्जी-भवाल) मंदार जोग (भवालकुमार-भवाल) वर्धन कामत (गेबडिनर विथ फेंडस) सतीश गवंस (वकील एक-लग्न फेरे) मयूर मयेकर(अश्वत्थामा अन्धा युग) याना प्राप्त झाली.
स्त्री गटात वैयक्तिक अभिनयासाठी दीपलक्ष्मी मोघे याना 'लग्न फेरे' नाटकातील रजनी भुमिकेसाठी प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले असून शेफाली नाईक यानी 'स्वार्थ पारायण' नाटकातील मारिया भुमिकेसाठी द्वितीय पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे. स्त्री गटात अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रे संस्कृती रायकर (कॅरन-डिनर विथ फ्रेंडस्) श्वेता महाजन (रमाबाई-स्वामी)चतुरा रायकर (ज्योतिर्मयी-भवाल) सोनिया शेट्ये (येसूबाई-इथे ओशाळला मृत्यू) प्राजक्ता कवळेकर (राणी विभवती-भवाल) याना प्राप्त झाली.

गोवा मच्छिमार संघटनेची CZMP मसुदा सुनावणी प्रकरणी नाराजी

उत्कृष्ट नेपथ्यासाठीचे पारितोषिक सौमित्र बखले याना 'अन्धा युग' नाटकासाठी प्राप्त झाले असून संदीप कळंगुटकर याना 'लग्न फेरे नाटकासाठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे. 'अन्धा युग' या नाटकाच्या प्रकाशयोजनेसाठी निलेश महाले यानी पारितोषिक मिळविले तर प्रशस्तीपत्र 'लग्न फेरे' नाटकासाठी वासुदेव चोपडेकर याना देण्यात आले. वेषभूषेसाठीचे बक्षिस अपुर्वा तिवरेकर याना 'भवाल' नाटकासाठी प्राप्त झाले असून प्रशस्तीपत्र शनया महाले याना 'अन्धा युग' नाटकासाठी देण्यात आले. उत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठीचे पारितोषिक रोहन रविंद्र नाईक यानी ‘भवाल’ या नाटकासाठी प्राप्त केले असून ऐश्ली मेडोन्सा याना ‘स्वार्थ पारायण’ या नाटकासाठी प्रशस्तीपत्र देण्यात आले. रंगभूषेचे पारितोषिक प्रदीप गोवेकर यानी ‘भवाल’ या नाटकासाठी संपादन केले. तर अमिता नाईक याना ‘अन्धा युग’ या नाटकासाठी प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे. स्वतंत्र नाट्यसंहिता लेखनाचे प्रथम पारितोषिक कौस्तुभ सोमनाथ नाईक याना ‘भवाल’ नाटकासाठी देण्यात आले असून खास स्पर्धेसाठी नाट्यसंहिता अनुवादनाचे पारितोषिक ज्ञानेश मोघे यांना ‘लग्न फेरे’ या नाटकासाठी देण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी विविध संस्थांकडून एकूण ११ नाटके सादर झाली. या स्पर्धेचे परीक्षण प्रदिप वेर्णेकर, राजीव शिंदे व विष्णूपद बर्वे या परीक्षक मंडळाने केले. पारितोषिकप्राप्त कलाकारांचे कला अकादमीतर्फे अभिनंदन करण्यात आले असून या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाची तारीख मागाहून जाहिर करण्यात येईल याची नाट्यप्रेमी रसिकानी व स्पर्धकानी नोंद घ्यावी असे कला अकादमीतर्फे कळविण्यात आले आहे.

संबंधित बातम्या